सातपूर : औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या नाशिक विभागाने औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्ताने काढलेल्या सुरक्षा रथ रॅलीचे सातपूर- अंबड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनी जोरदार स्वागत केले. ४ ते ११ मार्च दरम्यान औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे औचित्य साधत शुक्र वारी सकाळी सातपूर औद्योगिक वसाहतीतील जलतरण तलाव येथून सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले. सहसंचालक देवीदास गोरे यांच्या हस्ते सुरक्षा रथाचे फीत कापून आणि हवेत फुगे उडवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसंचालक धीरज खिरोडकर, कन्हैया झोपे, मार्गचे प्रमुख नॉबर्ट डीसुझा, बॉश कंपनीचे एचआर महाव्यवस्थापक मुकुंद भट, सुरक्षा विभागाचे राहुल शिरवाडकर, कौशिक गांधी, प्रेमप्रकाश शर्मा आदी उपस्थित होते. या सुरक्षा रॅलीचे सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखानदार आणि कामगारांनी आपापल्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार स्वागत केले. सदरचा सुरक्षा रथ अंबड औद्योगिक वसाहतीत फिरविण्यात आला. गरवारे पॉइंट येथे आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, निपमचे माजी अध्यक्ष जनार्दन शिंदे यांच्यासह उपस्थितांनी हवेत फुगे उडवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. अंबडलादेखील कारखानदार आणि कामगारांनी स्वागत केले. यावेळी प्राची सातपुते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सीमेन्स कंपनीत रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी सुरक्षा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. रॅलीत सहभागी झालेल्या आणि रॅलीचे स्वागत करणाºया सर्वांचे सहसंचालक देवीदास गोरे यांनी आभार मानले.
जनजागृती : औद्योगिक क्षेत्रात मिळाला प्रतिसाद सुरक्षा रथ रॅलीचे जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:37 AM
सातपूर : औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या नाशिक विभागाने औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्ताने काढलेल्या सुरक्षा रथ रॅलीचे सातपूर- अंबड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनी जोरदार स्वागत केले.
ठळक मुद्देऔद्योगिक वसाहतीतील जलतरण तलाव येथून सुरक्षा रॅलीचे आयोजन आपापल्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार स्वागत केले