नाशिक : भारतीय संस्कृतीतील अनेक धर्म, पंथांपैकी एक असलेल्या महानुभाव पंथाच्या माध्यमातून धर्मकार्याबरोबर निकोप समाज निर्मितीसाठी लोकप्रबोधनाचे कार्य निरंतरपणे करण्यात येत असून, या कार्यात नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या माध्यमातूून मोलाची भूमिका बनविण्यात येत आहे. श्रीचक्रधर स्वामी जयंती महोत्सवासारख्या कार्यक्रमात हजारो जनसमुदाय एकत्र येत असल्याने वैचारिक आदान-प्रदान होऊन विचारमंथन होते. त्यातूनच लोकप्रबोधनाला मोठी चालना मिळते, असा विचार महानुभाव पंथातील संतमहंत, अभ्यासक आणि पंथाचे अनुयायी यांनी मांडला. नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने दरवर्षी भगवान चक्रधर स्वामी जयंती उत्सव साजरा करण्यात येत असून, यंदा ४९ वा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणाºया या उत्सवातून लोकप्रबोधनाचे कार्य घडावे असाच उद्देश असतो. त्यादृष्टीनेच गेल्या पाच दशकांपासून समितीचा प्रयत्न राहिला आहे. विशेषत: समाजातील कर्मकांड, वाढती अंधश्रद्धा, जातिभेद, हिंसाचार, व्यसनाधिनता नष्ट होऊन एक निकोप समाज निर्माण व्हावा, पर्यायाने वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण भारतभूमीतील नवी पिढी सुसंस्कारित व्हावी हाच या जयंती उत्सवाचा विचार आहे, असे मत या संतमहंतानी मांडले. सुमारे ७५० वर्षांपूर्वी श्रीचक्रधर स्वामी यांनी १३ व्या शतकात तत्कालीन समाजातील वाढते कर्मकांड, सर्वसामान्य लोकांपासून दूर गेला धर्म, मागास, दीन-दुर्बल, आदिवासी आणि स्त्रिया धर्मकार्यास प्रतिबंध अशा अनिष्ट गोष्टींविरुद्ध संघर्ष करीत महानुभाव पंथाची स्थापना केली आणि मानवतावादी, समतावादी, अहिंसावादी स्त्री सन्मानाचे विचार मांडणारे नवे तत्त्वज्ञान मांडले. याचा मार्गाने पंथातील संत-महंत व अनुयायी जात असून, आजही हे विचार सर्वच समाज घटकाला प्रेरणादायी आहेत, असेही यावेळी आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री यांनी सांगितले. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात महानुभाव पंथाचे उपदेश तथा अनुयायी मोठ्या प्रमाणावर असूून, दरवर्षी पंथीय विचाराच्या लोकांमध्ये भर पडत आहे. अनेक लोक वेगवेगळ्या व्यसनांपासून परावृत्त होऊन पंथकार्याला हातभार लावत आहे. वेगवेगळ्या दुर्गुणांचा त्याग करून सद्मार्गास लागलेले लोक बघून समाधान वाटते, असे शास्त्री यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अन्य महंत, अभ्यासक आणि उपासक यांनी देखील पंथातील विविध विचारांचा परमार्श घेतला.जयंती महोत्सवातून पंथीय विचारांना चालनामहानुभाव पंथाने एकेश्वरी अनन्यभक्तीचा मार्ग साधून समाजाला निष्ठा शिकविली आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला साधकाचा धर्म ज्याला असतीपरी असे म्हणतात. हा आचरण सुलभ आहे. जीवन कसे जगावे याची शिकवण संत देतात. संयम, त्याग व सामंजस्य नसेल तर सुखोपभोगांची व भौतिक साधनांची विपुलता आणि संपत्तीचा प्रचंड साठा असूनसुद्धा मानवी जीवन सुखी होऊ शकत नाही. मनाची व विचारांची अस्थिरता निर्माण होते आणि ही अस्थिरता राष्ट्राच्या शांततेला, स्थैर्याला धोका पोहचते. त्यातूनच हिंसाचार वाढतो. त्याकरिता मनाची शांती, अहिंसा, समता, बंधुता याची पदोपदी शिकवण पंथाच्या माध्यमातून आम्ही देत असतो. विशेष म्हणजे जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमातून अधिक प्रमाणात लोकप्रबोधन घडून येते.- आचार्यप्रवर महंत सुकेणेकर शास्त्री, उपाध्यक्ष, अखिल भारतीय महानुभाव परिषद
निकोप समाजासाठी लोकप्रबोधन महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:31 PM