नाशिक : सार्वजनिक वाचनालयाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक अधिकारी माधव भणगे यांनी मंगळवारी (दि.७) वाचनालयाच्या कार्यालयात जाहीर केला. यावेळी १७२४ आजीव सभासदांसह १८५६ सर्वसाधारण सभासदांचा समावेश असलेली अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्यक्ष मतदानप्रक्रिया २ एप्रिल २०१७ रोजी पार पडणार असून, निवडणुकीचा निकाल ३ एप्रिल २०१७ रोजी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती भणगे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली. निवडणूक निर्णय अधिकारा भणगे यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जविक्री मंगळवारी (दि.७) सुरू झाली असून, सोमवारी (दि.१३) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे. गुरुवारी (दि.१६) उमेदवारी अर्जांची छाननीप्र्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारी ( दि.१७) वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची संधी मिळणार आहे. माघारीनंतर २० मार्चला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल व निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना २१ मार्चला चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर तब्बल उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्याठी जवळपास १० दिवसांचा कालावधी मिळणार असून, प्रत्यक्ष मतदानप्रक्रिया २ एप्रिल रोजी पार पडणार आहे. मतदानाच्या वेळी मतदारांनी संस्थेचे ओळखपत्र, शेषन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही एक ओळखपत्राचा पुरावा मतदानासाठी येताना सोबत आणणे आवश्यक आहे. मतमोजणी व निवडणुकीचा निकाल ३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माधव भणगे यांनी दिली आहे.
सार्वजनिक वाचनालयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By admin | Published: March 08, 2017 1:20 AM