लोकमत न्यूज नेटवर्कदेवळाली कॅम्प : पावसाळा सुरू झाल्यापासून देवळाली परिसरातील सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी तातडीने या सर्व ठिकाणी उपायोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागासह बांधकाम विभागाला दिले आहे.बुधवारी (दि. १९) मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, सहाय्यक अभियंता विलास पाटील आरोग्य अधीक्षक रजिंदरसिंह ठाकुर यांनी मेन स्ट्रीट येथील मुल्ला कॉम्प्लेक्स परिसरात सार्वजनिक मुतारी स्वच्छता तर वार्ड क्रमांक १ मधील मिठाई स्ट्रीटवर असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेची पाहणी केली. येथील आरोग्य विभागाकडून सार्वजनिक शौचालय यांसह सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छता व देखभाल करणेकामी दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सदर बाजार भागासह आनंद रोड, संसरी लेन, लाम रोड वर असणाºया कचरा, सार्वजनिक शौचालयांची पहाणी केली. यावेळी येथील रिपाइंचे पदाधिकारी गिरीश मोरे यांनी वॉर्ड क्रमांक १ मधील सार्वजनिक शौचालयांबाबत निर्माण झालेल्या समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर तातडीने या सर्व समस्या मार्गी लावण्याकामी आरोग्य विभागासह बांधकाम विभागातील अभियंता व अधिकारी तसेच कर्मचारी यांना येथील उपाययोजना करण्याबाबत सूचना करून तातडीने त्या मार्गी लावण्यात येतील याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यााात आले आहे.
देवळालीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे होणार साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:23 PM
दुरवस्थेची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार सहाय्यक अभियंता विलास पाटील आरोग्य अधीक्षक रजिंदरसिंह ठाकूर यांनी मेन स्ट्रीट येथील मुल्ला कॉम्प्लेक्स परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह तर वॉर्ड क्रमांक १ मधील मिठाई स्ट्रीटवर असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेची पाहणी केली.
ठळक मुद्देउपाध्यक्षांच्या तक्रारीवरून सीईओंचा पाहणी दौरा; कर्मचाऱ्यांना आदेश