नाशिक : उर्दू लेखक डॉ. फैयाज अहमद फैजी लिखित ‘बाल की खाल’ या हास्यव्यंगात्मक पुस्तकाचे प्रकाशन हैदराबाद येथील हास्यव्यंग मासिकाचे संपादक डॉ. मुस्तफा कमाल यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. फैयाज फैजी यांच्या लेखनातील नजाकतेबद्दल मान्यवरांनी प्रशंसोद्गार काढले. कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात मुंबईतील फन- कार ट्रस्टच्या वतीने पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, व्यासपीठावर आदिवासी विकास आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा. बेग एहसास, फनकार ट्रस्टचे सलाम बिन रज्जाक, अब्दुल हक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी, सलाम बिन रज्जाक यांनी नाशिकमध्ये जलसे होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. शब्द समजत नसले तरी भावना महत्वाची असते. उर्दू गजल ही धर्मनिरपेक्षतेवर चर्चा करत असते. त्यामुळे त्याची आजच्या काळात खूप गरज असल्याचेही सलाम बिन रज्जाक यांनी सांगितले. डॉ. मुस्तफा कमाल यांनीही फैजी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेरो-शायरी, कता यांचेही सादरीकरण झाले.
फैयाज अहमद फैजी लिखित ‘बाल की खाल’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:00 AM