येवला : येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइण्ड व येथील रंजना पठारे बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सप्तशृंगी लॉन्स येथे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी ब्रेल लिपीचे संपादक स्वागत थोरात होते.यावेळी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन स्वागत थोरात, सहायक पोलीस निरीक्षक विलास ताटीकोंडीलवार, नगरसेवक अमजद शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कांबळे, मायावती पगारे, स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते ब्रेल लिपीतील बुद्धवंदनेच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष पगारे म्हणाले की, आज आम्हांला अतिआनंद होत आहे की, नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी दिलेली बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन आम्हा सर्वांचे कल्याण झाले व जीवनाचे सोने झाले. परंतु आतापर्यंत कोणीही अंध बांधवांसाठी ब्रेल लिपीतच बुद्ध पूजापाठाचे पुस्तक निर्माण करण्याची दखल घेतली नाही. स्वागत थोरात यांच्या माध्यमातून बुद्ध पूजापाठ पुस्तक तयार करून त्याचे प्रकाशन मुक्तिभूमीत होत असल्याचा आनंद आम्हा येवलेकरांना झाला असून, आम्ही स्वारिप पक्षाकडून अंध बांधवांसाठी मदत करायला सदैव तयार आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमास विजय घोडेराव, अजहर शेख, शशिकांत जगताप, आकाश घोडेराव, बबन बागुल, बाळू आहिरे, हमजा मन्सुरी, राजाराम गायकवाड, चिंतामण आहिरे, तुळशिराम जगताप, संजय आहिरे, श्रीधर आहिरे, हिरामण दिवेकर, रंजना पठारे, कांताबाई गरुड, ज्योती पगारे, संगीता आहिरे, मनीषा शिंदे, शोभा उबाळे, सुचित्रा घोगरे, प्रभा मेश्राम, शोभा घोडेराव, अलका घोडेराव, करूणा आहिरे, वैशाली नागपुरे आदींसह तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.सुत्रसंचालन अजिज शेख यांनी केले. तर आभार शशिकांत जगताप यांनी मानले.
ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन बुद्धवंदना : बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइण्डचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 12:17 AM
येवला : येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइण्ड व येथील रंजना पठारे बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सप्तशृंगी लॉन्स येथे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ठळक मुद्देपूजापाठाचे पुस्तक निर्माण करण्याची दखल घेतली नाहीपूजापाठ पुस्तक तयार करून त्याचे प्रकाशन