सातपूर : दिल्ली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या विविध कथा एकत्र करून ‘सोल साँग’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. दिल्ली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी ‘क्विल क्लब’ उपक्रमाच्या माध्यमातून लेखनाला वाव देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी विविध ज्वलंत विषयांवर कथा लेखन केले. चिमुकल्या उदयोन्मुख लेखकांचे निसर्गसौंदर्य, पौराणिक, भावनिक असे कल्पकतेने केलेले लेखन एकत्र करून १४ विद्यार्थ्यांच्या कथांची निवड करण्यात आली. या कथांचे ‘सोल सॉँग’ नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. कार्यक्रमास समीक्षक संजय राघाटे, लेखिका अनामिका मिश्रा, लेखक एन. सी. देशपांडे, किशोर पाठक आदी उपस्थित होते. यावेळी निकोजकुमार शुक्ल, जितेंद्र क्षत्रिय या पालकांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा उपक्र म शाळेने राबविला आहे. विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने लिहिण्याचा प्रयत्न केला. या उज्ज्वल साहित्यिकांना प्रेरणा देण्याचे शाळेच्या शिक्षकांनी केले आहे. हा उपक्र म यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती संस्थेचे प्रदीप राजगरिया यांनी यावेळी दिली.
विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘सोल साँग’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:31 AM