चौकट -
कोबी दोन रु किलो
मागील सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात वांग्याचे दर काहीअंशी वाढले आहेत. फ्लॉवर दहा ते १७ रुपये तर कोबी अवघा एक ते दोन रुपये किलो दरनो विकला जात आहे.
चौकट -
द्राक्ष दर कोसळले
फळ बाजारात थॉमसन द्राक्ष ९ ते २१ रु तर सोनाका १२ ते ३२ रुपयांपर्यंत असून आरक्ता डाळींब १० ते ८० रु आणि मृदुला १२० रुपये किलोपर्यंत आहे. सफरचंदाचे भाव स्थिर असून घाउक बाजारात सफरचंदास ८० ते १२० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे.
चौकट-
तुरडाळ १२० रु किलो
किराणाबाजारात डाळींच्या भावात तेजी आली आहे. किरकोळ बाजारात तुरडाळ १२० रुपये किलोपर्यंत आहे. उन्हाळा सुरु झाल्याने उदीड डाळीला मागणी वाढु लागली आहे या डाळीतही दरवाढ झाली असून शेंगदाना चार ते पाच रुपयांनी वाढला आहे.
कोट -
कोरोनामुळे आधीच नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असताना दरवाढ झाल्याने किराणा बाजाराती ग्राहकीवर परीणाम झाला आहे. नविन गव्हाची आवक सुरु झाल्याने गव्हाच्या दरावर परीणाम झाला असून खाद्य तेलाचाही भडका उडाला आहे. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी
कोट-
कांदा बियाणे मिळत नव्हते तेव्हा शेतकऱ्यांनी मिळेल त्या दराने बियाणे घेउन कांदा लागवड केली. मोठ्या प्रमाणात खर्च करुन कांदा पिकविा आणि आज भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारी होणार आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यात खुली करावी . - दावल पगारे, शेतकरी
कोट -
डाळी, खाद्य तेल सर्वच महागल्याने सर्वसामांन्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल , डिझेल महागल्याने आधीच मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. आता सर्वसामांन्यांनी जगावेतरी कसे ? - अंजली जाधव , गृहीणी