चौकट-
तूर डाळ ४ रुपयांनी स्वस्त
संपूर्ण आठवडा दुकाने बंद ठेवावे लागल्याने किराणा बाजारातील उलाढल पूर्णपणे मंदावली असल्याचे चित्र या सप्ताहात दिसून आले. या सप्ताहातच केंद्र शासनाने डाळींची आयात खुली केल्याने डाळींची भाव उतरले असून उडीड डाळ ७ रुपयांनी तर तूर डाळ चार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
चौकट-
भाजीपाल्याचे दर चढेच
बाजार समित्या बंद असल्या तरी अनेक व्यापारी शिवार खरेदी करत असल्याने किरकोळ बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव चढेच राहिले. शेतकऱ्यांना फायदा झाला नसला तरी सर्वसामान्य ग्राहकांना मात्र भुर्दंड सहन करावा लागला.
चौकट-
सर्व फळांचे भाव वाढले
फळांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात सफरचंद, संत्रा, मोसंबी, किवी आदी फळांचे भाव वाढले आहेत. कोरोनामुळे फळांना ग्राहकांकडून मागणी चांगली होती.
कोट-
सोमवारपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असले तरी किराणा दुकानांवर सकाळी ११ वाजेपर्यंतचेच बंधन घालण्यात आले आहे. जे व्यापारी घरपाेहोच सेवा देतात त्यांना वेळेचे बंधन कशासाठी घातले जाते. दुकानांमध्ये गर्दी होत नसल्याने नियमांचे पालन करून व्यापार करू द्यायला हवा. - अनिल बूब, किराणा व्यापारी
कोट-
भाजीपाला हा नाशवंत माल असतो. तो जर वेळीच शेतातून काढला नाही तर शेतातच त्याचे नुकसान होते. यासाठी मिळेल त्या किमतीला विकणे या शिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्यामुळे नुकसान सोसूनही मिळेल त्या भावात माल विकला. - यशवंत गायधनी, शेतकरी
कोट-
लाॅकडाऊन असल्यामुळे भाजीपाला मिळत नाही असे विक्रेत्यांकडून सांगितले जाते. यामुळे सांगेल त्या किमतीत भाजीपाला खरेदी करावा लागतो. कोराेनामुळे आर्थिक संकट असताना त्यात दरवाढीची भर पडली आहे- मनीषा आहिरे, गृहिणी