शहरं
Join us  
Trending Stories
1
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
4
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
5
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
6
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
7
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
8
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
9
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
10
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
11
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
12
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
13
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
14
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
15
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
16
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
17
"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा
18
Swiggy IPO Listing: ₹३९० चा शेअर ₹४२० वर लिस्ट; इथेही Zomato पेक्षा मागे पडली कंपनी
19
ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

पेट्रोल खरेदी न करण्याचा पंपचालकांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 10:59 PM

मनमाड : गेल्या काही दिवसांपासून सर्वच इंधन कंपन्यांनी डिझेलसाठी अघोषित कोटा सिस्टीम लागू केला आहे. यामुळे अधिकृत विक्रेत्यांना मागणीच्या २० टक्केच डिझेल पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम सोमवारी (दि.३०) मनमाड शहर व परिसरात डिझेल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे दिसून आले. यामुळे चालकासह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच मंगळवारी (दि.३१) पेट्रोल पंप चालकांनी कंपनीकडून पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोमवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी नागरिकांनी पंपावर मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देडिझेल पंप झाले ड्राय : पंपासमोर ग्राहकांच्या लागल्या रांगा

मनमाड : गेल्या काही दिवसांपासून सर्वच इंधन कंपन्यांनी डिझेलसाठी अघोषित कोटा सिस्टीम लागू केला आहे. यामुळे अधिकृत विक्रेत्यांना मागणीच्या २० टक्केच डिझेल पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम सोमवारी (दि.३०) मनमाड शहर व परिसरात डिझेल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे दिसून आले. यामुळे चालकासह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच मंगळवारी (दि.३१) पेट्रोल पंप चालकांनी कंपनीकडून पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोमवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी नागरिकांनी पंपावर मोठी गर्दी केली होती.मनमाड शहरापासून जवळ असलेल्या पानेवाडी शिवारातीळ इंधन कंपन्यांमधून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आदी भागात इंधन पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसापासून इंधन पुरवठ्यामध्ये अनियमितता असल्यामुळे याचा सर्वात मोठा फटका पंपचालकाला बसत आहे. तसेच इंधनाची वाहतूक करणाऱ्या चालक-मालकांनाही बसत आहे. रोज सुमारे साडेतीनशे ते चारशे गाड्या भरत असताना गेल्या काही दिवसांपासून एका दिवसाला ७० ते ७५ गाड्या भरल्या जात आहेत. त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या गाडी मालकांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत. तसेच इंधन पुरवठा कमी होत असल्याने अनेक डिझेल पंप ड्राय दिसू लागले आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात वाढलेले भाव, कोसळणारे रुपयांचे मूल्य यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी इंधन कपातीवर भर दिला आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारPetrol Pumpपेट्रोल पंप