नाशिक : भरधाव मारुती स्विफ्टवरील चालकाचा ताबा सुटल्याने पुणे महामार्गावरील बोधलेनगर येथील एका झाडावर मोटार जाऊन आदळली. या अपघातात ज्येष्ठ नागरिक चालकाचा मृृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोडकडून द्वारकाकडे आपल्या मोटारीने (एमएच १५ सीटी ४४२९) जात असलेले दीपक वसंत देशपांडे (६५) यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार शुक्रवारी (दि. २२) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास झाडावर जाऊन आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते मयत झाले. देशपांडे हे कृषिनगरमधील मनोहर कॉलनी परिसरातील रहिवासी होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात योगेश शरद बक्षी (रा. गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास हवालदार सोनार करीत आहेत. दुपारी झालेल्या पुणे महामार्गावरील या अपघाताने रस्त्यावरील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे महामार्ग नाशिकरोड ते द्वारकापर्यंत अरूंद असून, वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावर असते. रस्त्यावर रात्रीच्यावेळी पथदीपांचा पडणारा प्रकाशही अपुऱ्या स्वरूपात असतो. बेशिस्त रिक्षाचालक वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून प्रवासी वाहतूक करतात. प्रवाशांची चढ-उतार करण्यासाठी वाहतुकीचा कुठलाही अंदाज न बांधता अचानकपणे भर रस्त्यात थांबून घेतात. प्रवाशांना घेण्यासाठी एकापाठोपाठ एकापेक्षा अधिक रिक्षाचालक चौकशी करताना दिसून येतात, अशावेळी वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते. दत्तमंदिर, नेहरूनगर, उपनगर, आंबेडकरनगर, बोधलेनगर, काठे गल्ली या परिसरातील चौफुलीवर नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. द्वारका ते नाशिकरोडपर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचा-यांनी गस्त घालून बेशिस्त रिक्षाचालकांसह वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणा-या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पुणे महामार्ग : भरधाव मारुती झाडावर आदळून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 4:12 PM
नाशिक : भरधाव मारुती स्विफ्टवरील चालकाचा ताबा सुटल्याने पुणे महामार्गावरील बोधलेनगर येथील एका झाडावर मोटार जाऊन आदळली. या अपघातात ज्येष्ठ नागरिक चालकाचा मृृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोडकडून द्वारकाकडे आपल्या मोटारीने (एमएच १५ सीटी ४४२९) जात असलेले दीपक वसंत देशपांडे (६५) यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार शुक्रवारी (दि. २२) ...
ठळक मुद्देदेशपांडे हे कृषिनगरमधील मनोहर कॉलनी परिसरातील रहिवासी पुणे महामार्ग नाशिकरोड ते द्वारकापर्यंत अरूंद