चांदवड : येथील आबड लोढा जैन महाविद्यालयात क्रीडा विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय कबड्डी मुले व मुली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या स्पर्धांमध्ये मुलांच्या गटातून पुणे जिल्हा प्रथम, तर नाशिक जिल्हा द्वितीय क्रमांकाने विजेता ठरला. त्याचप्रमाणे मुलींच्या गटातून पुणे शहर प्रथम तर नाशिक जिल्हा द्वितीय क्रमांकाने विजेता ठरला. या स्पर्धेतून पुणे विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला.स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाच्या समोरील प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गाळणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभागाचे सहायक संचालक डॉ. दत्ता महादम उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक डॉ. दत्ता शिंपी यांनी केले. यावेळी निवड समिती सदस्य डॉ. शोभा शिंदे, प्रा. दत्ता वाघचौरे, प्रा. उमेश बिबवे, प्रा. शांताराम धमाले, तसेच नाशिक विभागाचे सचिव डॉ. दीपक जुंद्रे, तसेच ग्रामीण विभागाचे उपसचिव डॉ. नरेंद्र निकम, प्रा. संतोष जाधव उपस्थित होते. तसेच विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या अभ्यास मंडळ सदस्य सुरेखा दप्तरे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांच्या वतीने प्रा. शकूर सय्यद यांचे भाषण झाले. अध्यक्षीय मनोगत प्रमोद पांडुरंग गाळणकर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. तुषार चांदवडकर यांनी, तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य यू. के. जाधव यांनी केले.साखळी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धांमध्ये मुलांच्या गटातून पुणे जिल्हा प्रथम, तर नाशिक जिल्हा द्वितीय क्रमांकाने विजेता ठरला. त्याचप्रमाणे मुलींच्या गटातून पुणे शहर प्रथम, तर नाशिक जिल्हा द्वितीय क्रमांकाने विजेता ठरला. या स्पर्धेतून पुणे विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला. हा संघ पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये मुलींसाठी नांदेड विद्यापीठात, तर मुलांसाठी अमरावती विद्यापीठात कबड्डीच्या खेळाचे प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेसाठी पंच म्हणून नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय पंच सुधाकर कातकाडे, राजेश निकुंभ उपस्थित होते. या विजेत्यांना पारितोषिक प्राचार्य डॉ. जी. एच. जैन यांच्या हस्ते देण्यात आले.
कबड्डी स्पर्धेत पुण्याच्या संघाला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 10:32 PM
चांदवड : येथील आबड लोढा जैन महाविद्यालयात क्रीडा विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय कबड्डी मुले व मुली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या स्पर्धांमध्ये मुलांच्या गटातून पुणे जिल्हा प्रथम, तर नाशिक जिल्हा द्वितीय क्रमांकाने विजेता ठरला. त्याचप्रमाणे मुलींच्या गटातून पुणे शहर प्रथम तर नाशिक जिल्हा द्वितीय क्रमांकाने विजेता ठरला. या स्पर्धेतून पुणे विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला.
ठळक मुद्देचांदवड : आबड महाविद्यालयात आंतर विभागीय स्पर्धा