इगतपुरी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरीस पुणे विद्यापीठाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाला. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ. पंडित शेळके, वित्त अधिकारी विद्या गारगोटे, अधिष्ठाता के. सी. मोहिते व प्राचार्य फोरम अध्यक्ष व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य नंदकुमार निकम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. दत्ता फरताळे, प्रा. रवींद्र अहिरे, प्रा. कल्पना वाजे यांनी सदर पुरस्कार नामदेव सभागृहातील कार्यक्रमात स्वीकारला. तसेच कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक प्रा. रवींद्र अहिरे व प्रा.श्रीमती कल्पना वाजे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून पुरस्कार स्वीकारला. (वार्ताहर)
इगतपुरी महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचा पुरस्कार
By admin | Published: May 19, 2014 10:04 PM