शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

पुणेगाव पोहोच कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:40 PM

तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाच्या अस्मितेचा पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची चर्चा सुरू झाली की, निवडणूक आली म्हणून समजावी, एवढी चेष्टा या प्रकरणाची झाली आहे. निवडणूक आली की अस्मिता जागवायची, मते मागायची. आणि एकदा का निवडणुका पार पडल्या की पुन्हा हा प्रश्न बासनात गुंडाळायचा. असे हे तीन पिढ्यांपासून सुरू आहे. राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या; पण या भागातील शेतकºयांना पाणी काही दिसले नाही. आता मात्र निवडणुकाचा काळ नसला तरी तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या प्रश्नासंबंधी सेना आणि राष्ट्रवादीला पुन्हा घुमारे फुटू लागले आहेत. श्रेयवादाची लढाई जोरदारपणे चालू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

येवला : तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाच्या अस्मितेचा पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची चर्चा सुरू झाली की, निवडणूक आली म्हणून समजावी, एवढी चेष्टा या प्रकरणाची झाली आहे. निवडणूक आली की अस्मिता जागवायची, मते मागायची. आणि एकदा का निवडणुका पार पडल्या की पुन्हा हा प्रश्न बासनात गुंडाळायचा. असे हे तीन पिढ्यांपासून सुरू आहे. राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या; पण या भागातील शेतकºयांना पाणी काही दिसले नाही. आता मात्र निवडणुकाचा काळ नसला तरी तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या प्रश्नासंबंधी सेना आणि राष्ट्रवादीला पुन्हा घुमारे फुटू लागले आहेत. श्रेयवादाची लढाई जोरदारपणे चालू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अंतिम टप्प्यात येऊन ठप्प झालेले मांजरपाड्याचे काम निधीअभावी अद्यापही रखडलेलेच आहे. नियोजनात असलेला निधी इतरत्र वळवला गेल्याने संतापात अधिकच भर पडली आहे. मांजरपाड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली. राजकीय पक्षांनी निवडणुकीत श्रेयवादासह राजकीय लढाई जरूर खेळावी, पण तालुक्याच्या या पाणीप्रश्नावर तत्काळ निर्णय घ्यावा. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे जनक स्व. आमदार जनार्दन पाटील यांनी जीवनभर उत्तर पूर्व भागात पाणी यावे म्हणून अथक परिश्रम घेतले आहेत. मांजरपाडा वळण बंधाºयाचे व बोगद्याचे दोन वर्षांपासून बंद असलेले काम तत्काळ सुरू व्हावे, ही मागणी करणारी कृती समितीदेखील आता पाठपुरावा करून थकली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलने, मोर्चे काढत हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र अद्यापपावेतो यश आले नाही. परंतु पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याच्या सिंहगर्जना मात्र होत आहे.माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने दरसवाडी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने पाणी सोडण्यात आल्याने या कालव्याच्या जलपूजनासाठी महाजन यांना निमंत्रित करण्यात आले असून, या हद्दीत पाणी पोहचताच जलपूजनाचा कार्यक्र म पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत व त्यांच्याच हस्ते होणार आहे. गत चाळीस वर्षांच्या कालखंडात या कालव्याच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या कालव्याचा प्रश्न अग्रक्र माने मांडला जातो. पालकमंत्र्यांनी कालव्याची पाहणी करून नंतरच पाणी सोडावे.-अंबादास बनकर, सहकार नेतेपुणेगाव-दरसवाडी कालव्याचे रु ंदीकरण व अस्तरीकरण आणि सर्वात महत्त्वाचे मांजरपाडा- १ या बोगद्याचे रखडलेले काम तसेच डोंगरगावपर्यंत अपूर्ण कामे पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. वरील कामे करण्याचे आश्वासन नको तर मंजुरी व आर्थिक तरतूद व्हावी अशी शासनाकडे मागणी आहे. ती पूर्ण करण्याकरिता प्रयत्न व्हावे. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचा इतिहास, वस्तुस्थिती व भविष्य नाकारून निसर्गाने दाखवलेली ईश्वरीकृपा याचा आधार घेत सुरू झालेली श्रेयवादाची लढाई म्हणजे अनेकांना आमदार होण्याची झालेली  घाई हेच आहे.- अ‍ॅड. माणिकराव शिंदे, राष्टÑवादीचे नेतेपाणी येवला हद्दीत जाण्यासाठी ३५ किमी आहे. १९ किमीला दाखल झाले असून, ओव्हर फ्लो चालू राहिल्यास पाणी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणात आहे. दुसरे जेसीबी मशीन उपलब्ध झाल्याने काम सोपे झाले आहे. पाणी आणण्यासाठी श्रमदानासह सहकार्य करणाºया येवलेकरांना धन्यवाद. सांगवी येथे पाणी तुंबल्याने कालवा फुटण्याची स्थिती निर्माण झाली होती. मी कडवाचे कार्यकारी अभियंता गावित यांच्याशी संपर्क साधून मशीनची मागणी केली. त्यांनी त्वरित मशीन उपलब्ध करून दिले. परिसरातील शेतकºयांनी मोठी मदत केली. येवला तालुक्यातून १०० शेतकरी श्रमदानातून काम करत आहे.  - संभाजी पवार, शिवसेना नेते