मालेगाव : शहरातील सूत व्यापारी, सराफ व कापड व्यापाऱ्यांची फसवणूक करणाºया आरोपी कापड व्यापारी भरतकुमार ब्रिजरतन मुंदडा रा. दिल्ली व शाम राठी रा. नवी मुंबई यांना पाच वर्षे कारावास, प्रत्येकी ५ लाख २१ हजार ११ रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी ठोठावली.शहरातील न्यू वॉर्ड मामलेदार गल्ली येथे आरोपी कापड व्यापारी भरतकुमार ब्रिजरतन मुंदडा व शाम राठी यांनी मुंदडा अॅण्ड कंपनी नावाने साडी व सलवार सूट विक्री नावाने दुकान सुरू केले.कापड व्यापारी मनोज रामकिसन बाहेती रा. मालेगाव कॅम्प, सूत व्यापारी रामकुमार मुंदडा, शिवकुमार मुंदडा, भूषण गांगुर्डे, रईस अहमद, भगिरथ चांडक यांच्याशी ओळख निर्माण करुन व कापड व्यापारी असल्याची बतावणी करुन सदर आरोपींना माल विक्री करण्यासाठी मालेगावातील व्यापाºयांना नियमित मालाची रक्कम देणार असल्याची बतावणी करून त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी शहरातील अनिलकुमार गोहेल टेलर, सराफ नीलेश घोडके, संतोष गणेश धडवाणी यांचीदेखील अशाच तºहेने फसवणूक करून त्यांच्याकडून खरेदी केलेल्या मालाची रक्कम दिली नाही. आझादनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले यांनी तपास करून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख रुपये जप्त करून बनविलेले खोटे दस्त व ओळखपत्र जप्त करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सरकार पक्षातर्फे १९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात गुन्हा शाबित झाल्याने आरोपींना सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.दंडाच्या भरलेल्या रकमेतून फिर्यादी मनोज बाहेती, राजकुमार मुंदडा, शिवकुमार मुंदडा, भूषण गांगुर्डे, रईस अहमद, रमा भगिरथ चांडक, गोहेल टेलर, सराफ निलेश घोडके, संतोष बडवाणी व कुणाल मालू यांना टक्केवारीनुसार रक्कम नुकसानभरपाई देण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी दिले.आझादनगर पोलिसात फिर्याद आॅगस्ट २०१५ ते ३ आॅक्टोबर २०१५ पर्यंत फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून ७४ लाख ६२ हजार ६०७ रूपये किमतीचे तयार कापड माल खरेदी करुन कपडा मालाचे पैसे फिर्यादी व साक्षीदार यांना न देता ४ आॅक्टोबर २०१५ रोजी शहरातील मुंदडा अॅण्ड कंपनी नावाचे दुकान बंद केले. दिल्ली येथे वडील वारल्याचे कारण सांगून मालेगावातून निघून गेले. त्यांनी फिर्यादी व साक्षीदाराची फसवणूक केली. त्यामुळे मनोज रामकिसन बाहेती यांनी आझादनगर पोलिसात फिर्याद दिली.
व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:34 AM
मालेगाव : शहरातील सूत व्यापारी, सराफ व कापड व्यापाऱ्यांची फसवणूक करणाºया आरोपी कापड व्यापारी भरतकुमार ब्रिजरतन मुंदडा रा. दिल्ली व शाम राठी रा. नवी मुंबई यांना पाच वर्षे कारावास, प्रत्येकी ५ लाख २१ हजार ११ रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी ठोठावली.
ठळक मुद्देमालेगाव : दिल्ली, मुंबईतील ठगांना पाच लाखांचा दंड