--------------------
धोंडबारच्या सरपंचपदी वंदना कवटे
सिन्नर : तालुक्यातील धोंडबार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना आत्माराम कवटे यांची, तर उपसरपंचपदी प्रकाश निवृत्ती खेताडे यांची निवड करण्यात आली. कवटे यांचा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------
पांढुर्ली विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन
सिन्नर : तालुक्यातील मविप्र संचलित पांढुर्ली येथील जनता विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन विज्ञान समितीच्या वतीने साजरा करण्यात आला. शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक व्ही. पी. उकिरडे, पर्यवेक्षक व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-----------
दोडी महाविद्यालयात आनलाइन व्याख्यान
सिन्नर : तालुक्यातील दोडी येथील ब्रम्हानंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त ऑनलाइन व्याख्यान पार पडले. दीपक राऊत यांनी मार्गदर्शन केले.
--------------
आठ दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ
सिन्नर : गेल्या आठ दिवसांत स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली. गॅसच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आल्याने एका सिलिंडरची किंमत ८२२ रुपये झाली आहे. गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
------
दापूरचा मोठेबाबा यात्रोत्सव रद्द
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील मोठेबाबा देवस्थान यात्रोत्सव कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस, ग्रामस्थ यांच्यात बैठक होऊन धार्मिक कार्यक्रम वगळता सामुदायिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.