काेरोना काळातील गेल्या नऊ महिन्यात सदर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या केसेसपेक्षा या वर्षी काही प्रमाणात केसेस संख्या कमी झाली, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत दंडाची रक्कम वाढली आहे. प्लास्टीक वापर कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने, प्लास्टीकचा वापर कमी झाल्याचे दिसून आले आहे. प्लास्टीक पिशवी वापरणाऱ्या १५ लोकांवर कारवाई करून ७५ हजार रुपये दंड वसूल केला, तर त्यांच्याकडून सुमारे ४४ किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. कचरा वर्गीकरण न करणाऱ्या ४७ नागरिक आणि ५ व्यावसायिक अशा ५२ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४१ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. प्लास्टीक, पालापाचोळा जाळणाऱ्यांकडून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाणात यंदा घट झाली आहे. नऊ महिन्यांत २०२ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ३८ हजार २०२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नदीपात्र प्रदूषित होऊ नये, यासाठी नदीपात्रात वाहने धुवण्यास मनाई आहे, तरी नियमांची पायमल्ली करून नदीपात्रात वाहने धुवणाऱ्यांवर कारवाई करून, त्यांच्याकडून १३ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. जैविक कचरा घंटागाडीत टाकल्याप्रकरणी १० हजार रुपये तर उघड्यावर थुंकणे, प्राण्यांनी रस्त्यावर विष्टा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. डेब्रिज टाकणाऱ्यांकडून ५९ हजार ६४० रुपये दंड केला आहे. चौकट====
कोरोना संसर्ग वाढल्याने सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी मास्कचा वापर न करणाऱ्या ३२९ नागरिकांवर कारवाई करत ६६ हजार रुपये दंड वसूल केला आहे. जून ते डिसेंबरपर्यंत केलेल्या कारवाईत सर्वाधिक कारवाई ऑक्टोबरमध्ये करण्यात आली.