दिंडोरी : शहरात कोरोना रु ग्ण सातत्याने वाढत असून एकूण रु ग्णसंख्या ११५ वर पोहचली आहे. नगरपंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा सोशल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे. मात्र काही नागरिक बेफिकिरी दाखवत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने तीन भरारी पथकाद्वारे दंडात्मक कारवाईला सुरवात केली आहे.गुरु वारी (दि.२४) गावातील ४१ नागरिकांवर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करत ४१०० रु पये दंड वसुल केला आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.दिंडोरी शहरात गेल्या महिन्यापर्यंत रु ग्णसंख्या कमी होती. मात्र या महिन्यात दररोज रु ग्णसंख्या वाढत आहे. नगरपंचायत प्रशासनाने दिंडोरीत सातत्याने गर्दी होऊ नये मास्क वापरावे याबाबत प्रबोधन केले. निर्धारित वेळेनंतर सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करत दुकाने सील केली. दर रविवारी शहरात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली जात आहे. मात्र सद्या सर्व व्यवसाय अनलॉक झाल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. परिणामी रु ग्णसंख्या ही वाढली असून त्यात खाजगी डॉक्टर व्यापारीही पॉझीटिव्ह आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.ठिकठिकाणी प्रबोधनात्मक बॅनर लावण्यात आले असून दिवसभर दवंडीची गाडी फिरवत नागरिकांचे प्रबोधन सुरू ठेवले आहे. तसेच मास्क वापरणे बंधनकारक करत त्याची प्रभावी अंमलबजावणी करत मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात धडक मोहीम राबवत मास्क न वापरणाºयांवर तसेच दुकानांपुढे सोशयल डिस्टन्स नपाळणाºया ठरलेल्या वेळेत दुकाने बंद न करणाºया व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नगरपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचारी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी व्यापार्यांनी काळजी घेत मास्क वापरावे सोसियल डिस्टन्स पाळावे सॅनिटायझरचा वापर करावा गर्दी करू नये शासनाचे नियम सूचनांचे काटेकोर पालन करावे व कोरोना विरु द्धच्या लढाईत सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष रचना जाधव, उपाध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले व सर्व नगरसेवकांनी केले आहे.
मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दिंडोरीत दंडात्मक कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 6:48 PM
दिंडोरी : शहरात कोरोना रु ग्ण सातत्याने वाढत असून एकूण रु ग्णसंख्या ११५ वर पोहचली आहे. नगरपंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा सोशल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे. मात्र काही नागरिक बेफिकिरी दाखवत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने तीन भरारी पथकाद्वारे दंडात्मक कारवाईला सुरवात केली आहे.
ठळक मुद्दे मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करत ४१०० रु पये दंड वसुल