दारणा नदीकाठाचा परिसर बिबटे, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांच्या अधिवासाकरिता ओळखला जातो. या भागात ऊसशेती, मक्याची शेती अधिक आहे. बिबटे शेतीमध्ये आश्रय घेतात, तसेच तरस हा वन्यप्राणी जवळच्या नदीकाठालगतच्या झाडी-झुडुपांमध्ये अथवा खडकाच्या कपारीत आश्रयाला असतो. दोनवाडे गावाच्या शिवारात स्मशानभूमीपासून जवळच एका झाडोऱ्यात तरसाच्या लहान अगदी आठवडाभरापूर्वी जन्मलेल्या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज शुक्रवारी काही गावकऱ्यांना आला. त्यांचे लक्ष या पिल्लाकडे गेले असता सुरुवातीला त्यांना श्वानाचे पिल्लासारखे वाटले. मात्र, निरखून बघितल्यानंतर हे तरसाचे पिल्लू असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांनी या पिल्लाला कुठल्याही प्रकारे स्पर्श न करता आहे, त्याच जागेवर ‘जैसे-थे’ ठेवले. वनविभागाला याबाबत माहिती कळविली असता, वनकर्मचाऱ्यांसह मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांनी घटनास्थळी धाव घेत पिल्लाला त्याची आई रात्रीतून घेऊन जाईल या पद्धतीने सुरक्षितपणे ठेवले. मात्र, मादीने या पिल्लाला स्वीकारले नाही. शनिवारी सकाळी पिल्लाला पुन्हा रेस्क्यू करत, वनविभागाच्या विश्रामगृहात आणले गेले. तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येऊन पिल्लू सुखरूप व सुदृढ असल्याचे सांगितले. शनिवारी रात्री पुन्हा पिल्लू आणि मादीची पुनर्भेट घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पदरी निराशा आली. रविवारी संध्याकाळी पुन्हा हा प्रयत्न वन्यजीवप्रेमी व वनकर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
--इन्फो--
तरसाचे पिल्लू दुर्मीळ
तरस हा वन्यप्राणी निशाचर असून, हा प्राणी लवकर नजरेस पडत नाही. या वन्यप्राण्याचे पिल्लू आढळून येणे ही अत्यंत दुरापास्त बाब असल्याचे वन्यजीवप्रेमींनी सांगितले. तरसाचे पिल्लू सहसा कधी बघावयास मिळत नाही. कारण या पिल्लाला मादी डोंगरांच्या कपारीमध्ये गुहेसारख्या जागेत अथवा नदीकाठालगतच्या भुसभुशीत जागेतील भुयार स्वरूपाच्या खोल खड्डयात जाऊन जन्म देत असते.
---
फोटो आर वर २५तरस १/२ नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
250421\25nsk_20_25042021_13.jpg~250421\25nsk_21_25042021_13.jpg
===Caption===
तरसाचे नवजात पिल्लू~तरसाचे नवजात पिल्लू