नाशिक : कोविडच्या संकटकाळात आदिवासी विकास महामंडळामार्फत खरीप आणि रब्बी हंगामात दीड लाख शेतकऱ्यांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात केंद्राच्या १ हजार ८१५ या किमान आधारभूत किमतीने ४९ लाख ११ हजार ९४३ क्विंंटल धान खरेदी करण्यात आली आहे.राज्य शासनामार्फत शेतकºयांना प्रोत्साहन म्हणून प्रतिक्विंंटल रु. ७०० जास्तीचा बोनस देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत साधारण ९०० कोटी रुपयांची धान्य खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या धानपैकी ३४ लाख ६२ हजार ३५० क्विंंटल तांदूळ राज्यभरातील ४७४ मिलमध्ये भरडण्यात आला. त्यापासून २३ लाख १९ हजार ७७५ क्विंंटल तांदूळ उत्पादन झाले. आतापर्यंत २१ लाख ८६ हजार ५८२ क्विंटल तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाºयाकडे वर्ग करण्यात आला आहे.कोविड कालावधीमध्ये चार हजार शेतकºयांकडून मका १ हजार ७६० रुपये, तर ज्वारी २ हजार ५५० रुपये प्रतिक्विंंटल या हमीदराने ३० कोटींचे भरडधान्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात खरेदी करण्यात आले आहे. भरडधान्य खरेदीची रक्कम बँक खात्यात जमा केली आहे.यावर्षी कोरोनाचे संकट असूनही आदिवासी विकास महामंडळाने मोठ्या प्रमाणात धान खरेदी करून आदिवासी शेतकºयांना दिलासा दिला आहे. या केंद्राना चांगला प्रतिसाद लाभल्याने गतवर्षीच्या तुलनेत महामंडळाची सर्वाधिक खरेदी झाली आहे.कोविड विषाणूच्या काळात आदिवासी विकास महामंडळ त्यांच्याकडील ३२ हजार क्विंंटल धान्य व कडधान्य अतिगरीब आदिम आदिवासी कुटुंबांना वाटप करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत ४० हजार कुटुंबांना तीन हजार क्विंंटल धान्याचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित धान्य वाटपाचे काम सुरू आहे.
आदिवासी महामंडळाकडून ४९ लाख क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 1:19 AM
कोविडच्या संकटकाळात आदिवासी विकास महामंडळामार्फत खरीप आणि रब्बी हंगामात दीड लाख शेतकऱ्यांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात केंद्राच्या १ हजार ८१५ या किमान आधारभूत किमतीने ४९ लाख ११ हजार ९४३ क्विंंटल धान खरेदी करण्यात आली आहे.
ठळक मुद्देरक्कम बॅँकेत जमा : आदिवासी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ७०० रुपये अधिक बोनस