उन्हाळा म्हटला की होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा सण-वार आणि त्यापाठोपाठ आंब्यांचा हंगाम सुरु होतो. परंतु कोरोना संसर्गजन्य परिस्थिती असल्यामुळे मातीकलेपासून बनविलेल्या वस्तूंची खरेदी मंदावली आहे. त्यामुळे कुंभार व्यवसाय पुन्हा संकटात सापडला आहे. एक-वर्षांपासून कुंभार व्यवसायाची चाके गती घेताना दिसत नाहीत. उन्हाच्या तीव्र झळांना सुरुवात झाली असून मागील काही दिवसात तापमानात वाढ झाली आहे. या काळात थंड पाण्याने तहान भागवण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठाला दरवर्षी चांगलीच मागणी असते. यंदा मात्र माठ विक्रेत्या कुंभारांच्या आव्याकडे, दुकानाकडे नागरिकांचा ओघ तुरळक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजेच संचारबंदी याचा फटका या व्यवसायला बसल्याचे चित्र सध्या बघण्यास मिळत आहे
.तालुक्यात अधिक कुंभार बांधव पारंपरिक पद्धतीने मातीपासून माठ बनवितात. खेडोपाडी,शहरात व जागोजागी ही माठाची दुकाने थाटून विक्री करत असतात. मात्र यावर्षीही पुन्हा कोरोनाच्या महामारीमुळे उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठाच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे तालुकाभरातील कुंभार बांधवांवर आर्थिक संकट कोसळले आहे. गावागावात माठ विक्रीच्या व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे. आज घडीला कमी खर्चात सहजरित्या शुद्ध पाणी मिळत आहे, शिवाय ते थंड करण्यासाठी घरातील फ्रिजचा मार्ग मोकळा असल्याने माठाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. सणवारासाठी लागणारे खापर, तसेच विविध मातीकलेपासून बनविलेल्या दुर्मिळ वस्तू याकडे ग्राहकांचा खरेदीसाठी कल नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुंभार व्यवसाय हा पूर्ण डबघाईला गेला आहे. कोरोनामुळे अजूनही परिस्थिती सावरत नसल्यामुळे व्यावसायिक मोठ्या चिंतेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
फोटो - २८ येवला ४
===Photopath===
280321\28nsk_15_28032021_13.jpg
===Caption===
कुंभार