नांदगाव : खरेदी केलेली मका ठेवण्यासाठी गुदाम नसल्याने नोंदणी केलेले ९९ शेतकरी मका विक्री करण्यापासून वंचित झाले आहेत. दरम्यान १५ रोजी मका खरेदीचा शेवटचा दिवस होता. अतिरिक्त मुदत मिळाली नाही तर आणि गुदाम उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.मकाच्या शासकीय खरेदीसाठी एजन्सी म्हणून येथील श्री शनैश्वर नांदगाव तालुका खरेदी विक्र ी संघाची नेमणूक २५ जून रोजी शासनाकडून करण्यात आली होती. पहिल्या काही दिवसात खरेदीच्या आॅनलाईन प्रक्रियेत १५८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शनैश्वर एजन्सीने खरेदी केलेली मका ठेवण्यासाठी, येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गुदाम भाड्याने घेतले. ५९ शेतकर्यांकडून खरेदी केलेली १५६७ क्विंटल मका ९ जुलै पर्यंत सदर गुदामात पाठविण्यात आली. दरम्यान सदरचे गुदाम पूर्ण भरून गेल्याने खरेदी थांबविण्यात आली.मनमाडच्या शासकीय गुदामात चौकशी करण्यात आली. मात्र ते आधीच भरलेले असल्याने जागा उपलब्ध झाली नाही. खासगी गुदाम उपलब्ध नसल्याने पुढील ९९ शेतकर्यांना मका आणू नका असे सांगण्यात आले.---------------पंधरा दिवसात योजना बासनातमक्यासाठी नवीन गुदाम उपलब्ध झाले नाही. एक महिन्यापासून नोंदणी करून सुध्दा शेतकरी प्रतीक्षेतच राहिले. शिवाय या खरेदी व्यवहारात एजन्सीला केवळ एक टक्का कमिशन मिळत असल्याने १७६० रूपये प्रति क्विंटल हमी भावामागे मिळतात. त्यामुळे एजन्सीला खरेदी केलेली मका इतरत्र वाहतूक करून ठेवणे परवडत नाही. अशी माहिती संघाचे चेअरमन विलास आहेर यांनी दिली. मालेगाव येथे शासकीय गुदामात जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरु असले तरी शेतकर्यांना त्या ठिकाणापर्यंत वाहतुकीचा खर्च सोसावा लागणार आहे. उशिराने २५ जून रोजी सुरु झालेली शासकीय मका खरेदी योजना अवघ्या १५ दिवसात, ९ जुलै रोजीच बासनात गुंडाळली गेली. नंतरचा कालावधी वाट बघण्यात गेला व आता खरेदीच बंद झाली.--------------१५ जुलैला तुमची नोंद क्र .एफ 2114459880 यशस्वी झाली असल्याचा मेसेज आला. गेला महिनाभर दररोज चौकशी करत आहोत. मात्र गुदामात जागा नाही असेच सांगण्यात आले. मका पावसाच्या वातावरणात खराब होत आहे. - बाळासाहेब सोनवणे, गंगाधरी
नांदगावी गुदामाअभावी रखडली मक्याची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 8:38 PM