नाशिक : यंदा जून महिन्याअखेरीस शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जांभळे विक्रीसाठी आलेले असून, चवीने गोड असलेल्या जांभळांना ग्राहकांची पसंती दिसून येत आहे.दरवर्षी साधरणत: जुलै, आॅगस्ट महिन्यात जांभळे विक्रीसाठी येतात, नाशिक जिल्ह्यात सर्वच भागांत शेताच्या बांधावर जांभळाची झाडे दिसून येतात, तसेच नाशिक शहरातील अनेक ठिकाणी बंगल्याच्या आवारात जांभळाची झाडे लावलेले आढळतात. यंदा झाडांना मोठ्या प्रमाणावर जांभळे लगडलेली दिसून येत असून, आदिवासी बांधव शरणपूररोड, संभाजी चौक, त्रिमूर्ती चौक आदी भागांत जांभळे विकतांना दिसत आहे. चांगल्या प्रतीच्या जांभळांचा दर शंभर रु पये किलो असून, ग्राहकांची त्याला मागणी दिसून येत आहे.पावसाळा सुरू झाला की, पिकलेली जांभळे हवेमुळे गळून खाली पडतात. मधुमेही रुग्णासाठी जांभळे गुणकारी असल्याचे सांगण्यात येते.
जूनअखेरीस बाजारात जांभळे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:37 AM