मालेगाव : मराठा समाजाने क्रांती मोर्चामुळे आदर्श घालून दिला असला तरी समाजाच्या पदरात काहीही पडलेले नाही. स्वत:ची प्रगती करायची असेल तर कालबाह्य शस्त्र आणि शास्त्र सोडून जागतिकीकरणाच्या प्रवाहात सामील व्हावे लागेल. त्यासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. येथे मराठा सेवा संघातर्फे आयोजित मेळाव्यात खेडेकर बोलत होते. खेडेकर म्हणाले, वेळ, श्रम, बुद्धी, कौशल्य, पैसा वापरून डोक्याच्या तेल मॉलिशपासून ते बूटपॉलिशपर्यंत जमेल ते व्यवसाय करून बेरोजगारी कमी करावी लागेल. अंधश्रद्धा आणि कर्मकांड सोडून पुढील वाटचाल शक्य होणार आहे. मराठा जनसंवाद दौºयानिमित्त आले असताना खेडेकर यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी केले. जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शिल्पा देशमुख यांनी प्रास्ताविक करून भूमिका मांडली. यावेळी अशोक पाटील, जगदीश खैरनार व आर. के. बच्छाव यांना मराठा भूषण पुरस्कार देण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मराठा विद्या प्रसारक अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, संचालक डॉ. जयंत पवार, मामको संचालक राजेंद्र भोसले, डॉ. दिलीप भामरे, डॉ. राहुल देशमुख, प्रमोद निकम, संजय हिरे, शिवाजीराव देवरे, अरुण पाटील, हरी निकम, जितेंद्र देसले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक रमेश निकम यांनी केले. आभार महानगरप्रमुख नितेश जगताप यांनी मानले.
पुरूषोत्तम खेडेकर : मराठा सेवा संघाचा मेळावा मराठा तरुणांनी सर्व क्षेत्रात उद्योग उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 10:52 PM
मालेगाव : मराठा समाजाने क्रांती मोर्चामुळे आदर्श घालून दिला असला तरी समाजाच्या पदरात काहीही पडलेले नाही.
ठळक मुद्देखेडेकर यांच्या उपस्थितीत मेळावा बेरोजगारी कमी करावी लागेल