मुखेड : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुष्पा वसंत वाघ तर उपसरपंचपदी सागर भिका वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपद एस. सी. स्त्री राखीव असल्याने पुष्पा वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना सरपंच घोषित करण्यात आले. तर उपसरपंचपदासाठी सागर वाघ व दत्तात्रय गुंड यांचे अर्ज होते. त्यानंतर दत्तात्रय गुंड यांनी माघार घेतल्याने उपसरपंचपदी सागर वाघ यांची वर्णी लागली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यादव यांनी काम पाहिले. तर ग्राम विकास अधिकारी मुंडे व तलाठी टिळे यांनी त्यांना मदत केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय पगार, साहेबराव आहेर, अर्जुन भवर, अनंता आहेर, भानुदास आहेर, बाबासाहेब गुंड, अनिता आहेर, रंजना कांगणे, सुरेखा सोनवणे, सिंधुबाई आहेर, शशिकला पगार, वैशाली पानसरे, सुवर्णा भवर आदी सदस्य उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. निवडीनंतर ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली.
मुखेडच्या सरपंचपदी पुष्पा वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 6:16 PM
मुखेड : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुष्पा वसंत वाघ तर उपसरपंचपदी सागर भिका वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपद एस. सी. स्त्री राखीव असल्याने पुष्पा वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना सरपंच घोषित करण्यात आले. तर उपसरपंचपदासाठी सागर वाघ व दत्तात्रय गुंड यांचे अर्ज होते. त्यानंतर दत्तात्रय गुंड यांनी माघार घेतल्याने उपसरपंचपदी सागर वाघ यांची वर्णी लागली.
ठळक मुद्देउपसरपंचपदी सागर वाघ यांची अविरोध निवड