निफाड : आयुष्य जगताना प्रतिष्ठा कमवा, तुमच्याकडे पॉवर कितीही असली तरी प्रतिष्ठा पॉवरपेक्षा मोठी आहे. प्रतिष्ठा असेल तर तुम्हाला जगताना कोणीही हरवू शकत नाही. जीवनात कोणत्याही पदावर जा तिथे प्रामाणिकपणा आणि निष्ठा ठेवा, असे प्रतिपादन अभिनेते व लेखक दीपक करंजीकर यांनी केले.निफाड येथील वैनतेय विद्यालयात न्या. रानडे जयंती महोत्सवांतर्गत ज्ञानाचा महोत्सव कार्यक्रमात ‘चला उंच भरारी घेऊ या, विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास घडवू या’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना करंजीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, विश्वस्त आप्पासाहेब उगावकर, वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, किरण कापसे, वैनतेय इंग्लिश मीडिअम स्कूल कमिटीचे सदस्य विश्वास कराड आदी मान्यवर उपस्थित होते. करंजीकर म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये उद्याच्या जीवनाची स्वप्न पाहण्याची ताकद दिसते. विद्यार्थी दशेत धारणा व्यक्त होत असतात. आयुष्यात दिलेला शब्द पक्का ठेवा. तुमची धारणा पक्की असेल तर शब्द पक्का राहातो. जीवनात एखादे कौशल्य आत्मसात करायचे असेल तर तुमचा विश्वास ठाम हवा. गरीब मेहनती मुले अभ्यास करून मोठे अधिकारी होतात, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्तविक व्यवहारे यांनी केले. प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य रविकांत कर्वे, संतोष गोरवे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, माधव बर्वे, शिवाजी ढेपले उपस्थित होते . सूत्रसंचालन संदीप चकोर यांनी केले. आभार रतन पाटील वडघुले यांनी मानले.
कोणत्याही ठिकाणी प्रामाणिकपणा ठेवा : करंजीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:14 PM
आयुष्य जगताना प्रतिष्ठा कमवा, तुमच्याकडे पॉवर कितीही असली तरी प्रतिष्ठा पॉवरपेक्षा मोठी आहे. प्रतिष्ठा असेल तर तुम्हाला जगताना कोणीही हरवू शकत नाही. जीवनात कोणत्याही पदावर जा तिथे प्रामाणिकपणा आणि निष्ठा ठेवा, असे प्रतिपादन अभिनेते व लेखक दीपक करंजीकर यांनी केले.
ठळक मुद्देसंडे अँकर । न्या. रानडे महोत्सव : निफाडच्या वैनतेय विद्यालयात कार्यक्रम