नाशिक : कार्यक्षमता वृद्धीसाठी संवाद कौशल्यामध्ये गुणात्मक वाढ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ओरिजिन फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप माने यांनी केले.महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित ‘संवाद-आयुष्य जगण्याची कला’ या विषयावरील कार्यक्रमात तेबोलत होते. व्यासपीठावर कुलगुरूडॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरूडॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. माने यांनी सांगितले की, संवाद ही अप्रतिम कला असून, दैनंदिन जीवन जगताना तिचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. तसेच समन्वयन संजय नेरकर यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रभावी संवादासाठी चर्चा अपेक्षित : कुलगुरूअध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, आपला संवाद प्रभावी होण्यासाठी चर्चात्मक कार्यक्रमात भाग घेणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठातर्फे राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये संवाद कौशल्य विषयावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य कार्यशाळेचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले.
संवाद कौशल्याने गुणात्मक वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:29 AM
कार्यक्षमता वृद्धीसाठी संवाद कौशल्यामध्ये गुणात्मक वाढ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ओरिजिन फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप माने यांनी केले.
ठळक मुद्देसंदीप माने : आरोग्य विद्यापीठात मार्गदर्शन