पिंपळगाव वाखारी : वाखारी-भिलवाड येथे ग्राम कोरोना दक्षता समिती व आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक शाळेत कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईन कक्ष सुरू करण्यात आला असून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी क्वारंटाईन कक्षात दाखल होऊन उपचार घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.वाखारी-भिलवाड येथे १५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान एकूण ११५ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळून आले. पैकी ६४ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून ५१ रुग्ण विलगीकरणात उपचार घेत आहेत. काही रूग्ण नियम पाळत नसल्याने रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे ग्रामदक्षता समिती व आरोग्य विभागाने गावात विलगीकरण कक्ष केला आहे. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, डॉ. संजय शिरसाट, सदस्य नितीन ठाकरे, ग्रामविकास अधिकारी सूर्यवंशी, आरोग्यसेवक, आशासेविका आदी उपस्थित होते.
वाखारी-भिलवाड येथे क्वारंटाईन कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 9:23 PM
पिंपळगाव वाखारी : वाखारी-भिलवाड येथे ग्राम कोरोना दक्षता समिती व आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक शाळेत कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईन कक्ष सुरू करण्यात आला असून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी क्वारंटाईन कक्षात दाखल होऊन उपचार घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.
ठळक मुद्दे११५ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळून आले.