शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

कोट्यधीश उमेदवार

By admin | Published: February 10, 2017 12:58 AM

महापालिका : पदाधिकाऱ्यांसह अनेक उमेदवार मालामाल

 अजय बोरस्ते नऊ कोटींचे मालकअजय भास्करराव बोरस्ते शिवसेना पक्षाचे उमेदवार असून, त्यांचे तांत्रिक क्षेत्रात शिक्षण झाले आहे. व्यापार वर्गातील बोरस्ते यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख ७६ हजार ६ हजार ३०५ रुपये असून, जंगम मालमत्ता एक कोटी ४१ लाख ७ हजार ३२० रुपये व स्थावर मालमत्ता सात कोटी ३७ लाख ९८ हजार ५७२ रुपये अशी एकू ण मालमत्ता ८ कोटी ७९ लाख ५ हजार ८९९ रुपये आहे. त्यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविली असून, त्यांच्यावर दोन वर्षे अथवा त्याहून अधिक शिक्षा होतील असे सात गुन्हे प्रलंबित आहेत. त्यांच्याकडे विविध संस्थांची एक कोटी ९७ लाख १ हजार २३ रुपयांची देयके आहेत. नरेंद्र पवार यांची साडेनऊ कोटींची मालमत्तानरेंद्र हिरामण पवार हे भाजपाचे उमेदवार व्यापारीवर्गातील असून, त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख २७ हजार ९५७ रुपये आहे. जंगम मालमत्ता ४६ लाख २१ हजार ८५७ रुपये असून, स्थावर मालमत्ता नऊ कोटी ३६ लाख ६६ हजार रुपयांची असून, एकूण मालमत्ता नऊ कोटी ८२ लाख ८७ हजार ८५७ रुपयांची आहे. त्यांनी यापूर्वी महानगरपालिके ची निवडणूक लढवलेली आहे. हिमगौरी अहेर- पाच कोटी रुपयेहिमगौरी बाळासाहेब अहेर या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असून, त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख ६६ हजार ७१ रुपये असून, जंगम मालमत्ता एक कोटी ९४ लाख ३ हजार २४६ रुपये, तर स्थावर मालमत्ता तीन कोटी ६९ लाख २१ हजार २०० रुपये आहे. त्यांची एकूण मालमत्ता पाच कोटी ६३ लाख २४ हजार ४४६ रुपये असून, त्यांचे सार्वजनिक वित्तीय संस्था तथा निमशासकीय संस्थांना दोन कोटी ५४ लाख ८७ हजार ९६६ दायित्व आहे. यापूर्वी त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. राणी देवरे पन्नास लाखांच्या आतराणी संजय देवरे या मनसेच्या उमेदवार त्यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाख ३३ हजार ४०० रुपये असून, जंगम मालमत्ता तीन लाख ४२ हजार ९९० रुपये आहे, तर स्थावर मालमत्ता १८ लाख रुपये आहे. त्यांची एकूण मालमत्ता २१ लाख ४२ हजार ९९० रुपये असून, त्यांची १४ लाख १८ हजार ४०० रुपयांची देयके थकीत आहे. त्या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.सुनीता गुळवे आठ कोटी रुपयेसुनीता संदीप गुळवे या शिवसेना पक्षाच्या उमेदवार असून, त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहेत. त्या गृहिणी आहेत. त्यांच्या कुु टुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाख ६० हजार रुपये असून, जंगम मालमत्ता ९९ लाख ७३ हजार १७९ रुपयांची, तर स्थावर मालमत्ता आठ कोटी ६३ लाख ६५ हजार रुपयांची असून, एकूण नऊ कोटी ६३ लाख ३८ हजार १७९ रुपयांची आहे. त्या पहिल्यांदाच निवडणूक रणांगणात उतरल्या आहेत. राकेश साळुंके यांची अवघी सव्वा लाखाची मालमत्ताराके श सुभाष साळुंके हे अपक्ष उमेदवार नववीपर्यंत शिक्षित असून, त्यांचा उद्योग अथवा व्यवसाय नाही. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपये असून, जंगम मालमत्ता ५१ हजार रुपयांची व स्थावर मालमत्ता ७५ हजार रुपयांची असून, एकू ण मालमत्ता १ लाख २६ हजार रुपयांची आहे. ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहे. गोकुळ पिंगळे ११ कोटीगोकुळ आनंदराव पिंगळे हे शिवसेनेचे उमेदवार दहावी उत्तीर्ण असून, शेती व्यवसाय करतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३५ लाख २१ हजार ५७९ रुपये असून, जंगम मालमत्ता १ कोटी ३५ लाख २७ हजार ६५५ रुपये आहे, तर स्थावर मालमत्ता नऊ कोटी ८५ लाख ७९ हजार ५०० रुपये असून, एकूण मालमत्ता ११ कोटी २१ लाख ७ हजार १५५ रुपये आहे. त्यांच्याकडे विविध संस्थांची दोन कोटी २९ लाख ७५ हजार ८१० रुपयांची देय्यके शिल्लक आहेत.सुवर्णा गटकळ अडीच कोटीसुवर्णा सतीश गटकळ या काँग्रेसच्या उमेदवार नोकरदार वर्गातील असून, त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नऊ लाख ३१ हजार ५१९ रुपये असून, जंगम मालमत्ता ५० लाख ३७ हजार ७५७ रुपये, तर स्थावर मालमत्ता दोन कोटी ३९ लाख ४७ हजार रुपयांची असून, एकूण मालमत्ता दोन कोटी ८९ लाख ८४ हजार ७५७ रुपयांंची असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

 

संगीता देसाई साडेचार कोटी संगीता राजेंद्र देसाई या शिवसेनेच्या उमेदवार व्यापारीवर्गातील असून, त्यांनी पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन कोटी ८ लाख १४ हजार ३९३ असून, जंगम मालमत्ता एक कोटी सात लाख ६१ हजार ९०१ रुपये, तर स्थावर मालमत्ता तीन कोटी २८ लाख २० हजार ४७४ रुपये अशी एकूण मालमत्ता चार कोटी ३५ लाख ८२ हजार ३७३ रुपयांची आहे. त्यांच्याक डे ३७ लाख ८० हजार रुपयांची देयके आहेत. आतापर्यंत त्यांनी एकही निवडणूक लढलेली नाही. योगेश हिरे पावणे दोन कोटीयोगेश रामराव हिरे हे भाजपाचे उमेदवार पदवीधर असून, शेती व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपये आहे. जंगम मालमत्ता ६१ लाख ६१ हजार ४९३ रुपयांची, तर स्थावर मालमत्ता एक कोटी ६१ लाख ६० हजार रुपयांची असून, एकूण दोन कोटी २३ लाख २१ हजार ४९३ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे तीन लाख ५७ हजार रुपयांची विविध संस्थांची देय्यके असल्याचे प्र्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. ते पहिल्यांदाच निवडणुक रिंगणात उतरले आहेत.

 

शैलेश श्रीहरी कुटे (७७ कोटी रुपये)नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधून निवडणूक लढविणारे कॉँग्रेस उमेदवार शैलेश कुटे हे केवळ कोट्यधीश नव्हे तर ७७ कोटींच्या चलअचल मालमत्तेचे मालक आहेत. व्यवसायाने लॅँड डेव्हलपर असलेल्या शैलेश कुटे यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय हा वडिलोपार्जित आहे. याशिवाय त्यांनी त्यात भर घालतानाच चांडक सर्कल जवळील एसएसके हे त्यांचे हॉटेल अलीकडेच सुरू झाले आहे. त्यांचे प्रॉपर्टीचे अनेक व्यवसाय भागिदारीत आहेत. प्रतिज्ञापत्रात त्याची तपशीलवार माहिती त्यांनी भरली आहे. त्यांच्या बॅँक खात्यात ७ लाख २५ हजार रुपये रोख असून, त्यांच्या पत्नीच्या नावे ७ लाख ७५ हजार रुपये असून, मुलगी रंगोलीच्या नावे १५ हजार रुपयांची रोकड आहे. गेल्या वर्षी त्यांनी १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा आयकर भरला आहे. कुटे यांनी कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्षपद भूषवले असून त्यांनी २००९ मध्ये मध्य नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली, त्यावेळी त्यांनी २२ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. सुरेश पाटील (७२ कोटी रुपये)महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मध्येच भाजपाचे बंडखोर असलेले सुरेश अण्णाजी पाटील यांची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मुळात कॉँग्रेसचे कार्यकर्ते असलेले सुरेश पाटील हे दहा ते बारा वर्षांपूर्वी भाजपात दाखल झाले आहेत. श्रध्दा लॅँड डेव्हलपर ही त्यांची जमीन खरेदी-विक्री आणि विकासक फर्म आहे. काही वर्षांपूर्वी येवलेकर मळा येथे त्यांनी श्रध्दा मॉल तसेच पेट्रोलपंप सुरू केला आहे. पाटील यांची मूळ मालमत्ता १ कोटी २७ काही लाख रुपये होती, तिचे सध्याचे मूल्यांकन ७२ कोटींच्या घरात गेले आहे. पाटील यांचे वार्षिक उत्पन्न ७० लाख ३१ हजार ३०६ रुपये इतके आहे. कुटुंबाची जंगम मालमत्ता ८३ लाख ४१ हजार ९७० रुपये इतकी असून स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन ७१ कोटी ३८ लाख ५८ हजार ७५२ रुपये आहे. एकूण मालमत्ता ७२ कोटी २२ लाख, दोन हजार ७२२ रुपये इतकी आहे. सुरेश पाटील यांच्यावर शासकीय आणि वित्तीय संस्थांचे एकूण कर्ज २५ कोटी १९ लाख ७६ हजार ३६३ रुपये इतके आहे.