नाशिक : आग लागण्यासाठी दुर्घटना ही कोणत्याही इमारतीत आणि व्यावसायिक आस्थापनेत लागू शकते; परंतु त्यासाठी केवळ रुग्णालयांनाच सक्ती का? वैद्यकीय व्यवसाय करणे गुन्हा आहे काय? वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणाºया रुग्णांच्या जीविताची काळजी नाही काय? - असे प्रश्न करीत, महापालिकेकडे व्यवहार्य भूमिकेचा अभाव असल्याचे मत शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी व्यक्त केले. काही व्यावसायिकांकडून जाणीवपूर्वक अडचणीत आणले जात असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या महाराष्टÑ अग्निसुरक्षा कायद्यातच एकदा भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर नव्याने ना हरकत घेण्याची तरतूद नाही. असे असतानाही अशा तरतुदी धाब्यावर बसवून सोयीनेच कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचा आरोप केला आहे.नाशिक महापालिका अग्निशमन कायदा (२००९) आणि रुग्णालयां संदर्भातील सुरक्षेचा कायदा (२०१३-१४) यांची एकत्रित अंमलबजावणी पूर्वलक्षी पद्धतीने करीत असून, त्यामुळेच वैद्यकीय व्यावसायिकांच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे अडचणीचे झाले आहे. त्यातच आता मेडिकल इन्शुरन्स अॅथॉरिटीने मुंबई शुश्रूषा कायद्यान्वये नोंदणी बंधनकारक केल्याने रुग्णांची मेडिक्लेम पॉलिसीची रक्कम मिळणे बंद झाले आहे.या सर्वाचा मागोवा घेताना डॉक्टर आणि महापालिका यांच्यातील वादाचा फटका रुग्णांना बसतो आहे. परंतु त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने राज्यात कुठेही नाही अशा पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी पद्धतीने म्हणजेच कायदा होण्याच्या अगोदरच्या इमारतींनाही नियम लावल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ज्यांच्याकडे महापालिकेची नोंदणी नाही अशा प्रकारचे सर्व डॉक्टर बोगस ठरवले जात असल्याने एकूणच या प्रकरणात वैद्यकीय व्यावसायिकांची मानहानी होत असल्याचा आरोपही आहे. माझ्या वडिलांनी १९७० साली पंचवटी कारंजावर रुग्णालय बांधले. त्यावेळी ते पंचवटी गावठाण होते. त्यावेळी प्रचलित कायद्याप्रमाणे सर्व परवानग्या घेतल्या आहेत. असे असताना आता नव्या नियमांची सक्ती करण्यात आली. या रुग्णालयावर दहा हजार लिटर आणि जमिनीवर पाच हजार लिटर्सची पाण्याची टाकी बांधावी असा महापालिकेचा नियम आहे. गावठाण भाग असल्याने भिंतीला भिंत खेटून मिळकती आहेत. त्यातच लोडबेअरिंगचे जुने बांधकाम आहे, त्यावर टाकी कशी उभारणार? स्ट्रक्चरल इंजिनिअरचे प्रमाणपत्र घेऊन ते मी मनपाच्या अग्निशमन दलाला दिले; परंतु त्यावर कोणेतही उत्तर नाही. केवळ तोच तो कायद्याचा कागद दाखवतात. वास्तविक, महाराष्टÑ अग्निसुरक्षा कायद्यानुसार एकदा मनपाने भोगवटा प्रमाणपत्र दिले याचा अर्थ ती इमारत सुरक्षितता आणि अन्य सर्व नियमानुसार वापरायोग्य आहे. मग अशा इमारतींना नवीन नियम कसे लागू होऊ शकतात? पंचवटी कारंंजावरील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात अग्निसुरक्षेचे कोणते नियम पाळले गेले आहेत?- डॉ. शोधन गोंदकर, रामालयम हॉस्पिटल, पंचवटी
सवाल : मनपाकडून व्यवहार्य भूमिकेचा अभाव, सवलतीच्या अन्य तरतुदींकडे दुर्लक्ष केवळ डॉक्टरच गुन्हेगार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:24 AM
नाशिक : आग लागण्यासाठी दुर्घटना ही कोणत्याही इमारतीत आणि व्यावसायिक आस्थापनेत लागू शकते; परंतु त्यासाठी केवळ रुग्णालयांनाच सक्ती का? वैद्यकीय व्यवसाय करणे गुन्हा आहे काय? वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणाºया रुग्णांच्या जीविताची काळजी नाही काय? - असे प्रश्न करीत, महापालिकेकडे व्यवहार्य भूमिकेचा अभाव असल्याचे मत शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देतरतुदी धाब्यावर बसवून सोयीनेच कायद्याची अंमलबजावणी मेडिक्लेम पॉलिसीची रक्कम मिळणे बंद