सायखेडा : परिसरात दुष्काळ पडला आहे. शेतातील उभे पिके पाण्याअभावी करपून जात आहे ,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे ,जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट झाला आहे शेतात लाखो रु पये खर्च करून पीक हातचे गेले आहे अशी भयानक अवस्था पाहण्यासाठी आमच्या शिवाराला भेट द्या अशी अर्त हाक तळवाडे ग्रामस्थानी दिली आहे. केंद्र सरकार मार्फत दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात पथक आले आहे पथक ठराविक भागाला भेट देणार आहे दुष्काळ परिस्थितीचा अहवाल तयार करून केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात येणार आहे पथकाने आमच्या गावात येऊन दुष्काळाची भयानक अवस्था पाहून शेतकऱ्यांना मदत करावी.निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे ,महाजनपुर, पिंपळगाव निपाणी, औरंगपूर, भेंडाळी या गावांना वर्षानुवर्षे दुष्काळ आहे सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही केवळ पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते पावसाळ्यात होणारा अनियमति पाऊस शेतकºयांच्या मुळावर उठला आहे.यंदा अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला विहिरीनां पाणी उतरले नाही पावसाळ्यात सुद्दा विहिरी कोरडीठाक असल्याने खरीप हंगामातील पिके हाती आली नाही उभे पिके डोळ्यासमोर करपून गेले शेतात खर्च केलेले भांडवल वाया गेले.
जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 5:40 PM