दाभाडी : दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्युत वितरण कंपनीतर्फे रस्त्यांच्या कडेला तारांना अडचण निर्माण होणाऱ्या झाडांची तसेच फांद्या तोडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तारा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. मात्र, यावर्षी उन्हाळा संपत आला असूनही सोयगाव येथील एसएमपीएसएल कंपनीने अद्याप कोणतेही काम केले नसल्याने अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
मागील आठवड्यातच वादळाने अनेक ठिकाणी झाडे पडली, विजेच्या तारा तुटल्या, असे असतानादेखील कोणतीही दखल घेण्यात आली नाही. सोयगाव येथील मराठी शाळेजवळ असणाऱ्या विद्युत तारांना तेथील झाडांच्या फांद्या लागून मोठ्या प्रमाणात घर्षण होते व त्यामुळे नेहमीच विद्युत पुरवठा खंडित होत असतो. हा रस्ता रहदारीचा असून या ठिकाणी भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी विद्युत तारांना निर्माण होणाऱ्या झाडांची अडचण दूर होण्यासाठी नागरिकांनी विद्युत कंपनीकडे अनेक वेळा ऑनलाइन तक्रार करून देखील अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. याआधीही अनेक तक्रारींकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. वीज बिल नियमित वसूल केले जाते. मात्र, नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत कंपनीकडून दखल घेतली जात नाही. कंपनीने अशा गोष्टींची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी सोयगाव येथील नागरिकांनी केली आहे.
----------------------
सोयगाव येथे विद्युत विभागाचा कारभार अतिशय बेजबाबदार व निष्काळजीचा आहे. नागरिकांकडून वीज बिल वेळेवर वसूल केले जाते. मात्र, त्याच नागरिकांच्या आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. तारांच्या निर्माण झालेल्या अडचणी वेळीच सोडविल्या नाहीत तर भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- सचिन देशमुख सोयगाव.
------------
सोयगाव येथे मराठी शाळेजवळ झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या विद्युत तारा. (२५ मालेगाव २)
===Photopath===
250521\25nsk_29_25052021_13.jpg
===Caption===
२५ मालेगाव २