इंदिरानगर : परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना अद्यापपर्यंत पेन्शन न मिळाल्याने आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इंदिरानगर, राजीवनगर, सार्थकनगर, पांडवनगरीसह परिसरात सुमारे ७० टक्के सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. यामध्ये बहुतेक राज्य सरकारी कर्मचारी असून, या सर्वांना महिन्याच्या सात तारखेच्या आत त्यांच्या बँक खात्यात पेन्शन जमा होते. परंतु मार्च महिन्याची पेन्शन एप्रिल महिना संपायला आला तरी अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे पेन्शनधारकासमोर कोरोनाच्या संकटाच्या काळात आपली उपजीविका कशी चालवायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील सुमारे ५० टक्के पेन्शनधारकांची मुले बाहेरगावी किंवा परदेशात नोकरीनिमित्त गेलेले आहेत.
पेन्शनअभावी ज्येष्ठ नागरिकांसमोर उपजीविकेचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:05 PM