शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

नायब तहसीलदारांपुढे प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 1:00 AM

नाशिक : दोन वर्षांपासून रखडलेला अव्वल कारकून ते नायब तहसीलदार पदोन्नतीचा प्रश्न चुटकीसरशी सोडवल्याचा दावा करून पदोन्नत नायब तहसीलदारांना नवीन नेमणुका देण्यात आल्या असल्या तरी, विभागीय पदोन्नती समितीने रिक्त असलेल्या १०४ जागांंपैकी जेमतेम ५९ जागा पदोन्नतीने भरल्या असून, चालू वर्षी आणखी ३७ नायब तहसीलदारांची पदे सेवानिवृत्तीने रिक्त होणार आहेत.

ठळक मुद्देवर्षभरात होणार ३७ पदे रिक्त : पदोन्नती मिळाली मात्र आचारसंहितेचे गडद सावट

नाशिक : दोन वर्षांपासून रखडलेला अव्वल कारकून ते नायब तहसीलदार पदोन्नतीचा प्रश्न चुटकीसरशी सोडवल्याचा दावा करून पदोन्नत नायब तहसीलदारांना नवीन नेमणुका देण्यात आल्या असल्या तरी, विभागीय पदोन्नती समितीने रिक्त असलेल्या १०४ जागांंपैकी जेमतेम ५९ जागा पदोन्नतीने भरल्या असून, चालू वर्षी आणखी ३७ नायब तहसीलदारांची पदे सेवानिवृत्तीने रिक्त होणार आहेत.चालू वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात समितीला आचारसंहितेमुळे पदोन्नती देण्यात अडचणी निर्माण होईल, परिणामी रिक्त पदांच्या अतिरिक्त भाराचे ओझे नायब तहसीलदारांवर कायम राहण्याची चिन्हे आहेत.अर्थात या सेवानिवृत्त नायब तहसीलदारांना पुढे तहसीलदारपदाची पदोन्नती न मिळाल्याने त्यांची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. मात्र नायब तहसीलदाराच्या पदोन्नतीचे स्वप्न पाहणाऱ्या विभागातील ५९ जणांना जानेवारी महिन्यात न्याय मिळाला. मुळात दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विभागीय पदोन्नती समितीची बैठक अपेक्षित असते.या बैठकीत पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर सेवानिवृत्त होणाºया नायब तहसीलदारांची संख्या विचारात घेऊनच आगाऊ पदोन्नतीचे सिलेक्शन करणे क्रमप्राप्त असते. जशी पदे रिक्त होतील त्या त्या प्रमाणात नायब तहसीलदारांची पदे भरली जावीत, असे संकेत असतात. परंतु जानेवारी महिन्यात विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत सन २०१९ अखेर रिक्त होत असताना त्याचा कोणताच विचार केला गेला नाही. समितीने ५९ जणांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती देत गेल्या आठवड्यात त्यांना ‘सोयी’ने नेमणुका दिल्या असल्या तरी, यंदा जवळपास ३७ पदे सेवानिवृत्तीने रिक्त होणार आहेत.या पदांचा समितीने विचार केलेला नाही. सप्टेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम व आचारसंहिता लागू असेल. अशा परिस्थितीत कर्मचाºयांच्या पदोन्नतीची बैठक घेणे बेकायदेशीर ठरणार आहे.आॅक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकारचा कारभार सुरू झालेला असेल अशा परिस्थितीत ३७ पदांंवर नायब तहसीलदार होऊ इच्छिणाºयांचे स्वप्न भंगच तर होईलच, परंतु त्यांच्या पदोन्नतीचा अधिकारही हिरावून घेतला जाऊन आर्थिक नुकसानही सोसावे लागणार आहे. १०४ नायब तहसीलदार निवृत्तगेल्या दोन वर्षांपासून विभागीय पातळीवरील पदोन्नती समितीला अव्वल कारकून, मंडळ अधिकाºयांच्या नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याबाबत बैठक घेण्यास अवधी मिळाला नसल्याने विभागात जवळपास १०४ नायब तहसीलदार सेवानिवृत्तीने निवृत्त झाले.