शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

पवारांची चौकशी लांबविण्याचा डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 11:30 PM

सेना आक्रमक : अखेर चौकशीचा प्रस्ताव मान्य

  नाशिक : महापालिकेने पाथर्डी फाटा परिसरात उभारलेल्या खतप्रकल्पातील विविध कामांच्या अनियमिततेबाबत ठपका ठेवलेले निवृत्त अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी लांबविण्याचा सत्ताधारी मनसेचा डाव शिवसेनेने उधळून लावला. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने महापौर अशोक मुर्तडक यांनी अखेर पवार यांच्या विभागीय चौकशीला मान्यता दिली. विभागीय चौकशी लांबविण्याबद्दल मनसेने दाखविलेल्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत सुमारे ६० कोटी रुपयांची मशिनरी खतप्रकल्पासाठी खरेदी करण्यात आली; परंतु काही मशिनरी अद्यापही धूळखात पडून आहेत. याशिवाय काही कामकाजाबाबत अनियमितता प्राथमिक चौकशीतून आढळून आल्याने आयुक्तांनी अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या महासभेपुढे ठेवला होता. सदरचा प्रस्ताव चर्चेला आला असता अपक्ष गटनेते व शिक्षण सभापती संजय चव्हाण यांनी सदरचा प्रस्ताव पुढच्या महासभेत ठेवण्याची सूचना केली. पवार हे उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याने महापालिकेने अगोदरच कॅव्हेट दाखल करून ठेवावेत, असेही चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण यांनी घेतलेली भूमिका पाहता चौकशी लांबविण्याचा हा सारा डाव असल्याचे शिवसेना सदस्यांच्या लक्षात आले. यावेळी शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी आक्रमक पवित्रा घेत चौकशीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची मागणी केली. अगोदर चौकशी होऊन जाऊ द्या, मग अहवाल पुढच्या महासभेवर आणावा, अशी सूचनाही बोरस्ते यांनी केली. सेनेचे शिवाजी सहाणे, डी. जी. सूर्यवंशी, भाजपाचे दिनकर पाटील, कॉँग्रेसचे उद्धव निमसे, माकपाचे तानाजी जायभावे यांनीही आर. के. पवार यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले. मनसेचे सुदाम कोंबडे यांनी खतप्रकल्प सुरू झाल्यापासून संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, असा आग्रह धरला. चौकशी लांबविण्याचा डाव अंगाशी येत असल्याचे लक्षात येताच महापौरांनी विभागीय चौकशीच्या प्रस्तावास मान्यता दिली.