नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासुन निर्लेखीत केलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत केव्हा होणार अशी शंका ग्रामस्थांच्या मनात घर करून असतानाच या प्रश्नाला पूर्णविराम देत शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या प्रयत्नांतून एच. ए. एल. कंपनीच्या सहकार्याने सी. आर. एस. फंडातून नवीन शाळा बांधकाम इमारतीचा भूमिपूजन सोहळा श्रीमती झनकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर होत्या, तर एच. ए. एल. कंपनीच्या वतीने सिव्हिल डेप्युटी मॅनेजर सुनील सहाणे, सिव्हिल असिस्टंट सुपरवायझर वानखेडे, कॉन्ट्रॅक्टर संदीप खैरनार, पंचायत समिती उपसभापती विमल गाढवे, इगतपुरी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी, सरपंच अश्विनी भोईर, विस्ताराधिकारी मोरे, तुकाराम सारुक्ते, सोपान घोरपडे, दत्तू जुंद्रे, विनायक पानसरे, संपत रोंगटे, ज्ञानेश्वर भोईर, भाऊराव रोंगटे, ससाणे, नारायण टोचे, रमेश टोचे किशोर दळवे, पांडुरंग आंबेकर, सुमन क्षीरसागर, निर्मला दिघे, कल्पना खैरनार, कुंदा फणसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. वैशाली वालझाडे यांनी सूत्रसंचालन, तर खैरनार यांनी आभार मानले.झनकर यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असताना मराठी शाळेतच शिक्षण घेण्याचेदेखील आवाहन केले तसेच मंदिर बांधण्यात आपण सहकार्य करतात तसेच शाळेसाठीही मदत करा व सहकार्य करा. त्यातून मुलांची प्रगती साधणे शक्य असल्याचे त्या म्हणाल्या.अनेक दिवसांपासूनचे मनाशी बाळगलेले जिल्हा परिषदशाळा इमारतीचे स्वप्न आज सत्यात उतरत असल्याने व यासाठी अतिशय प्रयत्नशील असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या भूमिपुत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या प्रयत्नातून आम्ही केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले.- तुकाराम सारुक्ते, शिक्षक
भरविर खुर्द येथील शाळेचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 8:36 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासुन निर्लेखीत केलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत केव्हा होणार अशी शंका ग्रामस्थांच्या मनात घर करून असतानाच या प्रश्नाला पूर्णविराम देत शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या प्रयत्नांतून एच. ए. एल. कंपनीच्या सहकार्याने सी. आर. एस. फंडातून नवीन शाळा बांधकाम इमारतीचा भूमिपूजन सोहळा श्रीमती झनकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.
ठळक मुद्देनांदूरवैद्य : शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते भूमिपूजन