पापी पेट का सवाल : दीड महिना उलटूनही पावसाने चांदवड तालुक्यात अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने पाणीटंचाईची झळ नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही बसू लागली आहे. पेरण्या लांबल्याने पशुपक्षी अन्न-पाण्यावाचून कासावीस झाले आहेत. एरवी सहजासहजी माणसाच्या जवळ न येणारा व पिंडदानाच्या वेळी मानवजातीला चातकाप्रमाणे प्रतीक्षा करायला लावणारा कावळा चक्क महिलेच्या हातातून पोळी घेण्यासाठी ओट्यापर्यंत यावा याचा अर्थ परिस्थिती किती भीषण झाली आहे हेच या छायाचित्रातून अधोरेखित होते.
पापी पेट का सवाल
By admin | Published: July 22, 2014 10:18 PM