नाशिक : श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ साजरा करण्यात आला, दरवर्षी २५ सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिन महाविद्यालयात साजरा केला जातो. यावर्षी महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तर्फे ‘करंट फार्मा अफेअर्स’ या विषयावर ऑनलाईन ‘क्विज’ प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली होती, तर ‘फार्मासिस्ट करिअर पाथ इन फार्मा इंडस्ट्री’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. यात ग्लेनमार्क, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक पवन संचेती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ऑनलाईन प्रश्नमंजूषेत अप्सरा शेख हिने प्रथम क्रमांक मिळवून ११०० रुपयांचे रोख पारितोषिक पटकाविले. मनीषा विसपूते हिने द्वितीय क्रमांक मिळवून ५०० रुपये रोख पारितोषिक पटकाविले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या समन्वयक, तसेच महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. प्रियंका झंवर यांच्या हस्ते सर्व फार्मसी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या अनघा सर्वज्ञ, विभागप्रमुख शिवानी चव्हाण, वरिष्ठ प्राध्यापक संजय भामरे, प्रा. स्वप्निल लोखंडे, आदी उपस्थित होते.
‘फार्मासिस्ट आणि आरोग्य व्यावसायिकांच्या ज्ञानाचा आदर व कामाची कदर समाजाला कोरोना काळात अधिक जाणवली, फार्मासिस्टना अनेक संघर्षांतूनही या काळात जावे लागले तरीही आज अत्यंत कष्टाने एक विश्वसनीय व्यावसायिक म्हणून समाजात फार्मसिस्टने स्थान मिळविले आहे, असे डॉ. प्रियंका झंवर उद्घाटनप्रसंगी म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख शिवानी चव्हाण यांनी केले. महावीर इन्स्टिट्यूट ऑफ बी. फार्मसीच्या प्रा. नम्रता वाडे, अंकिता सोनार यांनी प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून, तर महावीर इन्स्टिट्यूट ऑफ डी. फार्मसीच्या विभागप्रमुख शिवानी चव्हाण, प्रा. कुमुद अहिरराव यांनी समन्वयक म्हणून काम पहिले. यावेळी प्रा. कुमुद अहिरराव, अंकिता सोनार, नम्रता वाडे, श्रद्धा बोडके, मयूरी पोळ, काजळ खुर्दळ, सायली चोथवे, सोनिया सातपुते, वैदेही गायधनी, वैशाली भामरे, आदी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललित जाधव आणि उन्मेष जाधव यांनी परिश्रम घेतले. (फोटो २६ महावीर )