कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत. लस घेण्यासाठी येणाऱ्या बहुतांश जणांचा दुसरा डोस आहे; मात्र पहिले जो डोस घेतला आहे, तोच डोस त्या केंद्रावर दररोज उपलब्ध राहत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. मनपा प्रशासनाने डोसबाबत खऱ्या अर्थाने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तासन्तास रांगेत उभे राहून लस मिळत नसल्याने संबंधितांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
चौकट===
लस केंद्रावर लस घेण्यासाठी सर्वसामान्य तासन्तास रांगेत उभे राहतात; मात्र काही लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या जवळच्या लोकांना रांगेत उभे न करता वशिलेबाजी करून लस मिळवून देत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काही लस केंद्रांवर लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते जवळच्या लोकांना लस मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहत असल्याचे चित्र दिसत आहे.