शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

शीघ्र कृती दलाचे संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:53 PM

कोरोनाचे संकट निवारण्यासाठी लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या लॉकडाउनच्या काळात रमजान पर्वातील ‘शब-ए-कद्र’ची रात्र बुधवारी (दि.२०) साजरी होत आहे. पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करत शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांसह संचलन केले.

ठळक मुद्देभद्रकाली पोलीस ठाण्यात बैठक : प्रभावी अंमलबजावणी होणार

नाशिक : कोरोनाचे संकट निवारण्यासाठी लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या लॉकडाउनच्या काळात रमजान पर्वातील ‘शब-ए-कद्र’ची रात्र बुधवारी (दि.२०) साजरी होत आहे. पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करत शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांसह संचलन केले.येत्या २५ तारखेला रमजान ईदचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउन तसेच कलम-१४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने काही जिल्ह्यांत पाठविलेल्या शीघ्र कृती दलाच्या तुकड्यांपैकी नाशिकमध्येही एक तुकडी दाखल झाली आहे. या तुकडीत एकूण १२५ जवान आहेत. त्यामध्ये डेप्युटी कमांडंट, सहायक आयुक्त- २, पोलीस निरीक्षक- ३, उपनिरीक्षक- ४, महिला कर्मचारी- १० आणि उर्वरित जवानांचा फौजफाटा आहे.यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे मशिदी पूर्णपणे बंदच राहणार असून, नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच उपासना (इबादत) करावी, असे आवाहन शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात बुधवारी खतीब यांच्यासह धर्मगुरूंची बैठकही झाली. या बैठकीत शब-ए-कद्र तसेच रमजान ईदच्या नमाजपठणाबाबत चर्चा करण्यात आली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामुदायिक नमाजपठण करणे टाळावे, असे आवाहन यावेळी सहायक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक साजन सोनवणे आदी उपस्थित होते. बैठकीला रजा अकादमीचे एजाज रझा, मौलाना महेबूब आलम, मौलाना कारी अझहर, मौलाना मुजफ्फर अत्तार, हाजी जाकीर अन्सारी आदी उपस्थित होते.भद्रकाली पोलीस ठाण्यापासून परस्परांमध्ये ‘अंतर’ राखत जवानांनी सशस्त्र संचलन सुरू केले. हातामध्ये अत्याधुनिक गन, लाठी, तोंडावर फेस शिल्ड मास्क घातलेले निळ्या वर्दीतील जवान रस्त्यांवर उतरल्याचे पाहून नागरिकांची भंबेरी उडाली. नागरिकांनी लॉकडाउन नियमांचे पालन करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस