नाशिक : पहाटेपासून सुरू झालेली संततधार शनिवारी (दि.१४) सायंकाळी उशिरापर्यंत टिकून होती. दिवसभरात सकाळी साडेअकरा वाजेनंतर दीड ते पावणे दोन तास काहीशी पावसाने विश्रांती घेतली, मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत पुन्हा जोर‘धार’ सुरू झाली. सायंकाळपर्यंत २८ मि.मी. इतका पाऊस पडला. दुपारी चार वाजेनंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाचा जोर वाढला. त्यामुळे धरणातून सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपासून धरणातून २ हजार ५६२ क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आला.शहरात दिवसभर ढगाळ हवामान कायम राहिल्याने अधूनमधून हलक्या सरींचा वर्षाव पहाटेपासून सुरू झाला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत शहरात ९.६ मि.मी.पर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली. सकाळी साडेअकरा वाजेनंतर मात्र दोन तास पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे नागरिकांना दिवसभराची आवश्यक ती कामे आटोपता आली. बाजारपेठेत वर्दळ वाढून लगबग सुरू झाली, मात्र पुन्हा दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार
जोरदार संततधार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 1:13 AM
पहाटेपासून सुरू झालेली संततधार शनिवारी (दि.१४) सायंकाळी उशिरापर्यंत टिकून होती. दिवसभरात सकाळी साडेअकरा वाजेनंतर दीड ते पावणे दोन तास काहीशी पावसाने विश्रांती घेतली, मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत पुन्हा जोर‘धार’ सुरू झाली. सायंकाळपर्यंत २८ मि.मी. इतका पाऊस पडला. दुपारी चार वाजेनंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाचा जोर वाढला. त्यामुळे धरणातून सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली.
ठळक मुद्दे२७.९ मि.मी. पाऊस । ‘गंगापूर’मधून २,५०० क्यूसेकचा विसर्ग; गोदावरीच्या पातळीत वाढ