भात व नागलीचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी शेतातील एका कोपऱ्यात जमिनीची भाजणी केली जात आहे. पालापाचोळा, गोवऱ्या, खत, झाडांच्या बारीक फांद्या पसरवून पेटवून जमिनीत असलेले गवताचे बियाणे जळून जमीन भुसभुशीत केली जात आहे. अशा भाजणीच्या जागेवर नंतर भात व नागलीची रोपे तयार केली जाणार आहेत. आदिवासी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जूनमध्ये सुरू होत असला तरीही त्याची पूर्वतयारी मात्र एप्रिल मे महिन्यापासूनच सुरू करण्यात येते. आदिवासी भागात शेतकऱ्यांना राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते. मात्र, अशा कामासाठी येथील शेतकरी वृक्षांची कत्तल करीत नाहीत. उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरुपयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहचवता छाटून घेतल्या जातात. त्यामध्ये गवत, खत व इतर सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो. यात कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक किंवा हानिकारक ज्वलनशील पदार्थ नसतात. यामुळे पर्यावरण संरक्षण तर केले जातेच शिवाय जमिनीचा पोतही सुधारत असतो.
कोट...
इगतपुरी तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस भात लागवडीपूर्वी राब भाजणीची कामे केली जातात. यामुळे भात पिके तरारून येतात. पिकांवर कुठल्याही प्रकारचे अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे भातलागवड करण्यापूर्वी पालापाचोळा, तसेच शेणखताची भाजणी करून त्याठिकाणी भाताचे बियाणे टाकली जातात. यामुळे पिकांना धोका उद्भवत नाही.
- राजू काजळे. शेतकरी, नांदूरवैद्य
छायाचित्र - २८ नांदूर राब
इगतपुरी तालुक्यात आगामी भात हंगामाची पूर्वतयारी म्हणून राब भाजणी करण्यात आलेली जमीन.
===Photopath===
280521\28nsk_25_28052021_13.jpg
===Caption===
इगतपुरी तालुक्यात आगामी भात हंगामाची पूर्वतयारी म्हणुन राब भाजणी करण्यात आलेली जमीन.