पांगरी : तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या पांगरी येथील बंधारे यावर्षी ओसंडून वाहू लागल्याने पांगरी परिसरात रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.पांगरी परिसरात नेहमी पावसाचे प्रमाण कमी असते. भोजापूर धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर पूरपाणी नदीद्वारे या बंधाºयात सोडण्यात आले होते. आजही बंधाºयात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.खरीप हंगामातील मका पिकावर लष्करी आळीने थैमान घातल्याने यावर्षी मक्याचे उत्पादन घटणार आहे. तसेच सतत पडणाºया पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले असून त्यामुळे बळीराजाच्या नजरा रब्बी पिकाकडे लागून राहिल्या आहे. धरणओवर फ्लो झाल्याने सिंचन प्रश्न सुटला आहे. यामुळे आता रब्बी पिकांच्या उत्पन्नाकडे शेतकºयांनी लक्ष केंद्रीत केले आहे.पांगरी परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने येथीलनदी, नाले, बंधारे कोरडेठाक पडलेहोते. पावसाळा संपत आलाहोता.मात्र बंधाºयामध्ये जेमतेम पाणी होते. पांगरी व परिसरात या वर्षी मध्यम पाऊस पडला. परंतुनदीला पूर येईल किंवा धरणे भरतील एवढा पाऊस झालानव्हता. परंतु भोजापूर धरणाच्या पूरपाणी पांगरी पर्यंत पोहोचलेनेसर्व धरण भरले आहे.पांगरी व परिसरात दुग्ध व्यवसाय मोेठ्या असल्याने मका व चारा करण्याकरिता शेतकºयांचा कल वाढणार आहे.पांगरी येथील वसंत बंधारा भरल्यास पिण्याचा पाणी प्रश्न बºयाच अंशी कमी होणार असल्याने तसेच रब्बी पिकांना याचा फायदा होणार असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
रब्बी पिकांच्या आशा पल्लवीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:36 PM