ेसिन्नर : रब्बीसाठी भोजापूर धरणातून बुधवारी (दि.२८) सोडण्यात येणार आवर्तन लांबले आहे. दोडी आणि संगमनेर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांमध्ये चाऱ्या दुरूस्तीची कामे प्रलंबित असल्याने आवर्तन पुढे ढकलल्याचे कारण पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांकडून देण्यात येत आहे. त्याचबरोबर पूर्व भागातील शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक झाल्यानेच आवर्तन पुढे ढकलल्याची चर्चा आहे.भोजापूरचे आवर्तन सोडावे यासाठी प्रारंभ संगमनेर तालुक्यातील निमोण व परिसरातील ग्रामस्थांनी कºहे घाटात रास्ता रोको केला होता. त्यानंतर नांदूरशिंगोटे व दोडी परिसरातील शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनतर वावी येथे रास्ता रोको आंदोलन करुन दुशिंपूर व फुलेनगर बंधाºयात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पूर्व भागतील विशेषत: वावी परिसरातील शेतकºयांची सोमवारी (दि.२६) रोजी तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत भोजापूरच्या पाण्यासंदर्भात आग्रही मागणी केली. फुलेनगर बंधाºयात निºहाळे फत्तेपूर, माळवाडी, घोटेवाडी या गावांच्या पाणी योजनांच्या उद्भव विहिरी आहेत. यापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी ४.३९ दशलक्ष घनफूट पाणी या बंधाºयात सोडले जात असताना यंदा त्यास कात्री लावल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
भोजापूरचे रब्बीचे आवर्तन लांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 5:46 PM