सटाणा : विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अनेक आपत्तीचा सामना करत शासन स्तरावर पाठपुरावा करून विविध विकासांची कामे केली जात आहेत. कोरोनासारखे संकट किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळातही विकासकामे सुरू ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करीत आहोत. अशा परिस्थितीतही न थाबंता विकासकामे यापुढेही नियमित सुरू राहतील, असे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले आहे.
बोरसे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ७) बागलाण मतदारसंघातील नामपूर जिल्हा परिषद गटातील सुमारे साडेतेरा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडले, त्यावेळी बोरसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती यतीन पगार, जिल्हा परिषद सदस्य कन्हू गायकवाड, पंचायत समिती सभापती ज्योती अहिरे, शीतल कोर, नामपूर बाजार समितीचे सभापती शांताराम निकम, संचालक भाऊसाहेब अहिरे, भाऊसाहेब कांदळकर, भाऊसाहेब कापडणीस, रूपेश शहा, सचिन हिरे, जिभाऊ कोर, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश देवरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक शिंदे, किरण ठाकरे, भैया दहिते, शेखर मोरे, सतीश पवार, पप्पू पवार, संजय पवार आदी उपस्थित होते.
बोरसे यांच्या हस्ते टिंगरी येथे पाणीपुरवठा योजना, दोधनपाडा येथे सभामंडप बांधणे, चिराई ते तळवाडे भामेर रस्ता डांबरीकरण करणे, राहुड येथे पुलाचे बांधकाम करणे, महड येथे सभामंडप बांधणे, बहिराणे येथे काँक्रिटीकरण करणे, टेंभे वरचे येथे काँक्रिटीकरण करणे, टेंभे खालचे पुलाचे बांधकाम करणे, इजमाने रस्ता मजबुतीकरण करणे, बिजोरसे येथे सभामंडप बांधणे, मळगाव भामेर येथे पाणीपुरवठा योजना, मोराणे सांडस येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, अंबासन येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, काकडगाव येथे रस्ता तयार करणे, खीरमाणी येथे पाणीपुरवठा योजना लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
-----------------
फोटो कॅप्शन : मोराणे सांडस येथे आमदार निधीमधून काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करताना बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, समवेत जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार, कन्हू गायकवाड, पंचायत समिती सभापती ज्योती अहिरे, बाळासाहेब भदाणे, किरण ठाकरे आदी. (०७ सटाणा १)
070921\07nsk_41_07092021_13.jpg
०७ सटाणा १