त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीत कारवाईत्र्यंबकेश्वर : पंचायत समितीतील सेवानिवृत्त औषधनिर्माण अधिकाºयास सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यासाठी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणाºया सहायक लेखाधिकारी प्रवीण यशवंत शिंपी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़ ३) रंगेहाथ पकडले़ औषधनिर्माण अधिकारी दयाराम अहिरे सेवानिवृत्त झाले आहेत़ त्यांचा सहाव्या वेतन आयोगातील फरक १ लाख ८ हजार ६१५ रुपये निघाल्याने तो मिळावा यासाठी सहायक लेखाधिकारी प्रवीण यशवंत शिंपी (रा़नाशिक) यांनी आठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ लाचलुचपत विभागाने शिंपी यांना अहिरे यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ प्रकरणे प्रलंबितत्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले आहे़ तसेच अहिरेंसारखीच अनेक प्रकरणे याठिकाणी हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवली जात असल्याचीही चर्चा आहे़ दरम्यान, याप्रकरणी सहायक लेखाधिकारी शिंपी यांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
लाचखोर सहायक लेखाधिकाºयास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 11:46 PM