नाशिक : महिला व बाल कल्याण समितीच्या निधीचा दुरुपयोग केल्याच्या आक्षेपानंतर ही कामे रद्द करण्याच्या मागणीसाठी सरसावलेल्या शिवसेनेच्या महिलांना कॉँग्रेस आणि राष्टÑवादीची साथ मिळाली आणि पीठासनासमोर अभूतपूर्व गोंधळ झाला. भाजपाचे नगरसेवकही मैदानात उतरल्यानंतर आधी गोंधळ, मग घोषणाबाजी त्यानंतर माईक ओढल्यानंतरही महापौर रंजना भानसी ऐकत नसल्याने अखेरीस राजदंडाची ओढाताण सुरू झाली आणि या गदारोळात राष्ट्रगीत सुरू करून महापौरांनी कामकाजच संपविले.सोमवारी (दि.९) झालेल्या महासभेत सुरू असलेल्या या गदारोळात महापौरांनी महिला व बाल कल्याण समितीच्या नूतन सदस्यांची नावेच जेमतेम घोषित करू शकल्या. परंतु नंतर मात्र त्यांनी सर्व समिती सदस्यांची नावे घोषित झाल्याचा अजब दावा केला. या प्रकारामुळे नाशिककरांना अस्वस्थ करणाºया करवाढीच्या मुद्द्यावर चर्चाच झाली नाही. महापालिकेची महासभा सोमवारी (दि.९) सकाळी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. सर्वच विषय मंजूर झाल्याचा दावासभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर महापौरांनी सभागृहाचे कामकाज गुंडाळले. त्यानंतर त्यांच्या दालनात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. महापौरांनी सभेचे कामकाज अर्धवट राहिले आणि नंतर सभा बोलवू, असे सुरुवातीला सांगितले. मात्र, नंतर सर्व विषय मंजूर झाल्याचे घोषित केले तेव्हा माईक बंद होता आता नव्याने सभा बोलाविण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी महापौरांना विचारलेल्या प्रश्नांना आधी गटनेते संभाजी मोरूस्कर उत्तरे देत होते. अन्य विषय समितीच्या सदस्यांची नावे घोषित झाल्याचा दावा मोरूस्करांनी केला. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना आयुक्तांनी त्यांना समिती सदस्यांच्या नावांची प्रेस नोट द्या, असे सूचवले. त्यामुळे एकंदरच सत्तारूढ भाजपा आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात समन्वय वाढल्याचे दिसून आले. विशेषत: महापौर भानसी यांनी आयुक्तांशी चर्चा करूनच अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. सभेत महिला व बाल कल्याण समिती, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती, विधी आणि शहर सुधार समिती अशा चार समिती सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी बोलाविलेल्या महासभेच्या प्रारंभी २० फेबु्रवारी रोजी झालेल्या महासभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय होता. २० फेबु्रवारीस झालेल्या महासभेत शहरात करवाढ लागू करण्याच्या विषयावरून विरोधकांनी गोंधळ घालत बहिष्काराचे अस्त्र उगारले होते. तरीही विरोध डावलून भाजपाने शहरवासीयांवर ३६ टक्के करवाढ लादली होती. त्याविरोधात पडसाद उमटल्याने प्रशासनाकडे ठराव पाठविताना महापौरांनी १८ टक्के करवाढीचाच प्रस्ताव मान्य केल्याचे कळविले होते. दरम्यानच्या काळात आयुक्तांनी सर्व मिळकतींवर कर लागू करण्यासाठी पावले उचलत अगदी मोकळ्या जागा आणि शेती क्षेत्रावरही कर लागू केल्याने त्याचे पडसाद महासभेत उमटण्याची शक्यता होती.विरोधकांनी तशी तयारी केली होती. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रारंभीच इतिवृत्त मंजुरीच्या विषयावरून राष्टÑवादीचे गजानन शेलार यांनी आक्षेप घेतला. घरपट्टीत वाढ करण्याच्या विषयावरून विरोधकांनी गोंधळ घातला होता आणि बहिष्कार घातला होता. घरपट्टीबाबतच उपसूचनाही केली असताना या सर्व घडामोडींचा उल्लेख न करता घरपट्टी दरवाढ सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगताच महापौरांनी त्यात दुरुस्ती करू, असे सांगितले.
महापालिकेत राडा; राजदंडाची ओढाताण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 1:05 AM
नाशिक : महिला व बाल कल्याण समितीच्या निधीचा दुरुपयोग केल्याच्या आक्षेपानंतर ही कामे रद्द करण्याच्या मागणीसाठी सरसावलेल्या शिवसेनेच्या महिलांना कॉँग्रेस आणि राष्टÑवादीची साथ मिळाली आणि पीठासनासमोर अभूतपूर्व गोंधळ झाला. भाजपाचे नगरसेवकही मैदानात उतरल्यानंतर आधी गोंधळ, मग घोषणाबाजी त्यानंतर माईक ओढल्यानंतरही महापौर रंजना भानसी ऐकत नसल्याने अखेरीस राजदंडाची ओढाताण सुरू झाली आणि या गदारोळात राष्ट्रगीत सुरू करून महापौरांनी कामकाजच संपविले.
ठळक मुद्देमहासभेचा झाला आखाडाअनेक नगरसेविकांना दुखापत पीठासनावरील माईक ओढले,