नाशिक : मतदार पुर्नरिक्षण मोहिमेंतर्गंत नाशिक मध्य व मालेगावच्या दोन्ही विधानसभा मतदार संघात नेमण्यात आलेल्या केंद्रस्तरीय अधिका-यांनी (बीएलओ) अद्यापही काम सुरू न केल्याने त्यांच्याविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची तयारी अंतीम टप्प्यात असून, तत्पुर्वी त्यांना एक अंतीम संधी देण्यात येणार आहे, या उपरही काम सुरू न केल्यास गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्यायच नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.निवडणूक शाखेने काम न करणा-या बीएलओंवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना तहसिलदारांना दिल्यानंतर काही तालुक्यांमध्ये कारवाईच्या भितीने दोन दिवसात समाधानकारक काम सुरू झाले असून, नऊ हजार कुटुंबाना पंधरा दिवसात भेटी देणा-या बीएलओंनी एका दिवसात हाच टप्पा २१ हजारापर्यंत गाठला आहे. सर्वाधिक काम दिंडोरी तालुक्यात झाले असून, त्या खालोखाल चांदवड, नांदगाव व बागलाण या तालुक्यांनी चांगली सुरूवात केली आहे, त्यानंतर मात्र अन्य तालुक्यांमध्ये अजुनही बीएलओंकडून थंड प्रतिसाद दिला जात आहे. त्यातल्या त्यात मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व नाशिक मध्य या तीन मतदार संघात नेमलेल्या बीएलओंकडून गृहभेटीचा दुहेरी आकडाही गाठलेला नाही त्यामुळे निवडणूक कायद्यान्वये त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याशिवाय कोणताही पर्याय नसून, गुन्हा दाखल केल्यानंतर मात्र त्यांच्या जागी नवीन बीएलओंची नेमणूक केली जाणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार पुर्नरिक्षणाचे संथ गतीने काम सुरू असल्याचे पाहून या मोहिमेला १५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असल्याने त्यानंतर मुदतवाढ मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे निवडणूक यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे, गृहभेटी देणाºया बीएलओंकडून दररोज आॅनलाईन आढावा घेतला जात आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत २१ हजार गृहभेटी झाल्या आहेत. त्यातही नाशिक व मालेगावचे काम सुरूच न झाल्याने संबंधित तहसिलदारांनी बीएलओंवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. सोमवार व मंगळवार पर्यंत बीएलओंना अंतीम संधी दिली जाईल व त्यानंतर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असे सुत्रांनी सांगितले.
नाशिक, मालेगावचे बीएलओ रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 2:44 PM
मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व नाशिक मध्य या तीन मतदार संघात नेमलेल्या बीएलओंकडून गृहभेटीचा दुहेरी आकडाही गाठलेला नाही त्यामुळे निवडणूक कायद्यान्वये त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही
ठळक मुद्देकमी गृहभेटी : गुन्हा दाखल करण्यापुर्वी अंतीम संधी शुक्रवारी सकाळपर्यंत २१ हजार गृहभेटी झाल्या आहेत.