कामगार नाट्य स्पर्धानाशिक : भारत स्वतंत्र झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच देशाच्या फाळणीच्या वेदना या आनंदावर वीरजण टाकणाऱ्या होत्या. भारत-पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती झाली आणि आजही या फाळणीच्या वेदना जनसामान्यांना अस्वस्थ करून जातात. फाळणीचे शल्य आजही मन व्यथित करून टाकते. फाळणीचा वेदनादायी प्रवास ‘रॅडक्लिफ लाइन’मधून रंगमंचावर सादर करण्यात आला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६व्या नाट्य महोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत सोमवारी कामगार कल्याण केंद्र, शिरपूरच्या वतीने ‘रॅडक्लिफ लाइन’ हे नाटक परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि.१७) सादर करण्यात आले.भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या योजनेनुसार सीमा आयोगाच्या अध्यक्षपदी इंग्लंड येथील सर सिरिन रॅडक्लिफ यांची नियुक्ती केली होती. रॅडक्लिफ यांनी फक्त भौगोलिक दृष्टिकोनातून भारताची फाळणी केली. त्यांनी आखलेल्या सीमारेषेमुळे दोन्ही नागरिकांची ही मने दुभंगली गेली. अनेक बाबतीत भारतीय जनता संभ्रमात होती. याचा फायदा काही धर्मांध लोकांनी घेऊन आपला स्वार्थ साधला. आजही काश्मीरमध्ये राहणाºया तरुण पिढीला अशाच प्रकारे गैरसमजात ठेवून त्यांच्याकडून ‘जिहाद’च्या नावावर अनेक मानवताविरोधी कार्य करून घेतले जाते. याभोवती नाटकाचे कथानक फिरत जाते. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत पाटील यांनी केले. नाटकात आकाश पाटील, अविनाश इंगळे, दिनेश माळी, वामन शिंदे, हरिष बागुल, महेश पाटील, मंगलसिंग गिरासे, मनोहर लोहार, किशोर शिरसाठ, रामेश्वर वाघ, अमृत पाटील यांसह कलाकारांनी भूमिका केल्या.आजचे नाटक , बळी , ललित कला भवन, जळगाव
फाळणीचा वेदनादायी प्रवासाची ‘रॅडक्लिफ लाइन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:18 AM