नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंदे्र अचानक बंद करण्यामागच्या कारणांचा खुलासा अखेर झाला असून, आधार केंद्रचालकाने कामास ठेवलेल्या व्यक्ती आधार काढण्यासाठी आलेल्यांकडून पैसे गोळा करीत असल्याची बाब उघडकीस येऊन त्यातील एकाला रंगेहाथ पकडण्यात आल्यामुळे नाचक्की टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्रे तातडीने बंद करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाºयांच्या दालनाच्या खालीच उपरोक्त गंभीर प्रकार घडत असल्यामुळे त्याची वाच्यता न करता संबंधितांनी प्रकरण रफादफा केल्याची चर्चा होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असून, काही वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेल्यांचे डाटा अद्ययावत करण्यासाठी पुन्हा आधार केंद्रात जावे लागत आहे. मुळात पूर्वीचे खासगी कंपन्यांना देण्यात आलेली केंदे्र सरकारने बंद करून त्याचे सरकारीकरण केल्यामुळे आधार केंद्राची संख्या कमी असल्याने होणारी ओरड लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दीड महिन्यापूर्वी दोन आधार केंद्रे सुरू करण्यात आली होती. नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या या केंद्राला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता केंद्रांची संख्या वाढविण्याचा विचार सुरू झाला होता. सकाळी सात वाजेपासून नागरिक आधार केंद्राबाहेर रांगा लावत असल्याने त्याचा गैरफायदा केंद्रचालकाने घेतला व आधार काढण्यासाठी येणाºया नागरिकांना बाजूला नेऊन त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर ते दोनशे रुपयांची आकारणी करून तातडीने आधार काढून देण्याचे काम सुरू केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कॅन्टीनच्या पाठीमागे पैसे ‘देण्या-घेण्याचे’ काम राजरोस गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने त्याची वाच्यता जिल्हाधिकारी कार्यालयातीलच एका नायब तहसीलदाराने केली. त्याने सदरचा प्रकार पाहिल्याने पैसे घेणाºया ‘आधार’च्या कर्मचाºयाला रंगेहाथ पकडण्यात येऊन वरिष्ठ अधिकाºयाच्या पुढ्यात उभे करण्यात आले. आधार केंद्र चालकाच्या सांगण्यावरूनच पैसे गोळा केले जात असल्याचे लेखी कबुली जबाब सदर कर्मचाºयाने लिहून देण्याबरोबरच त्याने दिलेली कबुली व्हिडीओचित्रीतही करण्यातआली आहे.
पैसे घेऊन ‘आधार’ काढणाºयाला अभय प्रकरण रफादफा : जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 1:01 AM
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंदे्र अचानक बंद करण्यामागच्या कारणांचा खुलासा अखेर झाला आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांच्या दालनाच्या खालीच गंभीर प्रकारदीड महिन्यापूर्वी दोन आधार केंद्रे सुरू